Share

८५ कोटींची ऑफर अन् एका रात्रीत गेम? ठाकरे गटाचे ६ खासदार शिंदेंकडे जाताच रोहित पवार आक्रमक

ठाकरे गटाचे ६ खासदार शिंदे गटात सामील होणार आहेत. यावर रोहित पवारांनी ८५ कोटींच्या रेटचा आरोप करत जोरदार हल्लाबोल केला आहे.

Published On: 

Rohit Pawar eknath Shinde Faction shift of 6 MPs

🕒 1 min read

पुणे – एका खासदारासाठी तब्बल ८५ कोटींची बोली लावली जाऊ शकते का? सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात हाच सर्वात मोठा प्रश्न विचारला जात आहे. उद्धव ठाकरे गटाचे तब्बल ६ खासदार एकनाथ शिंदे गटात दाखल होणार असल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी या गटाला मंजुरी देखील दिली आहे. एकनाथ शिंदे यांनी लोकसभा अध्यक्षांची भेट घेतली. त्यानंतरच हा मोठा राजकीय भूकंप झाला. काल रात्री चार्टर्ड विमानाने या सर्व खासदारांना दिल्लीत नेण्यात आले.

या राजकीय घडामोडींवर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी अत्यंत तीव्र शब्दात संताप व्यक्त केला आहे. लग्न एकासोबत करायचं आणि भलत्याचाच हात धरून पळून जायचं असा टोला त्यांनी लगावला. हा राजकीय व्यभिचार असून आपण हुकूमशाहीकडे वाटचाल करत असल्याचे ते म्हणाले.

एका खासदाराचा रेट ८५ कोटी रुपये असल्याचा गंभीर आरोप रोहित पवार यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून केला. एवढा पैसा या पक्षाकडे येतो कुठून असा खडा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. दिल्लीत राजकीय हालचालींना वेग आला असतानाच ठाकरे गटाकडूनही संताप व्यक्त केला जात आहे.

राज्यासमोर आज अनेक गंभीर प्रश्न उभे आहेत. दुष्काळाचे सावट आहे आणि पाण्याची मोठी टंचाई आहे. शेतमालाला भाव नाही आणि वाढती बेरोजगारी यावर कोणीच बोलायला तयार नाही. त्यामुळेच सामान्य माणूस अडचणीत असताना लोकप्रतिनिधींचा हा बाजार दुर्दैवी असल्याची खंत पवारांनी व्यक्त केली. देशात असेच चालत राहिले तर जनताच रस्त्यावर उतरून धडा शिकवेल असा इशाराही त्यांनी दिला.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही