Sanjay Raut : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Narendra Modi) लाल किल्ल्यावरून युवाशक्तीचे आभार मानले असतील, तर मीही मोदींचे आभार मानतो. हा देश नेहमीच आपल्या युवा शक्तीच्या बळावर प्रगती करत आला आहे. त्यामुळे, ज्यांचे वय ७५ वर्षे पूर्ण झाले आहे, त्यांनी सत्ता सोडून ती युवा शक्तीच्या हाती सोपवली पाहिजे, असा टोला शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना मोदींना लगावला.
स्वातंत्र्यदिनानिमित्त लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी युवा शक्तीसाठी महत्त्वपूर्ण घोषणा केल्या. देशाच्या विकासाची गुरुकिल्ली युवा शक्तीच्या हातात आहे, असे त्यांनी नमूद केले. यावरून राऊत यांनी मोदींवर कडक टीका केली. युवाशक्तीनेच देशाला आकार दिला आणि मोकळा श्वास घेण्याची संधी निर्माण केली. भगत सिंगांसारखे तरूण फासावर गेले, असेही त्यांनी नमूद केले.
Sanjay Raut targets PM Narendra Modi
जंतर-मंतरवरील आंदोलनाने देशाला हादरवून सोडले, ज्यामुळे देशाभोवती आवळलेला फास सैल होण्यास आणि देशाला मोकळा श्वास घेण्यास मदत झाली. कदाचित म्हणूनच मोदींनी युवाशक्तीचे आभार मानले असावेत, त्याबद्दल मीही त्यांचे आभार मानतो. देश नेहमीच युवा शक्तीच्या बळावर पुढे गेला असल्याने, ७५ वर्षांवरील व्यक्तींनी पायउतार होऊन सत्ता युवा शक्तीच्या हाती सोपवली पाहिजे. तीच आपल्या देशाच्या स्वातंत्र्याला खरी मानवंदना असेल, असे संजय राऊत म्हणाले.
कोविड-१९ आणि इतर संकटाच्या काळात विरोधकांनी देशात संकट आणि भीतीचे वातावरण निर्माण करण्याचे काम केल्याचा आरोप मोदींनी केला. राऊत यांनी या विधानालाही प्रत्युत्तर दिले. मोदी खोटे बोलत आहेत. स्वातंत्र्यदिनी तरी खोटे बोलू नये, आज देशाचा स्वातंत्र्यदिन आहे. हजारो लाखो तरुणांनी त्यांचा पवित्र आत्मा देशासाठी बलिदान केला आहे. त्यांचे स्मरण करण्याऐवजी मोदी अशी विधाने करत आहेत, ही दुर्दैवी बाब आहे, असे राऊत म्हणाले.
काँग्रेस, समाजवादी आणि डाव्या पक्षांनी ज्यांना मोदी आपले विरोधक मानतात. देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात सहभाग घेतला नसता, तर मोदींना पंतप्रधान म्हणून भाषण करणे कधीच शक्य झाले नसते. किंबहुना त्यांनी चलेजाव चळवळीला विरोध केला होता, असे इतिहास पुराव्यासह सांगतो. त्यांनी ‘भारत छोडो’ आंदोलनाला विरोध केला होता. मोदींचा टीकेचा रोख काँग्रेसवर असेल तर ते स्वातंत्र्य लढ्याशी बेईमानी करत आहेत. हे दुर्देवाने म्हणावे लागेल.
“काँग्रेसशी आपले कितीही मतभेद असले, तरी देशाच्या स्वातंत्र्यलढ्यातील त्या पक्षाचे योगदान कोणीही नाकारू शकत नाही. स्वातंत्र्यलढ्याच्या प्रखर सूर्यावर पंतप्रधानांनी थुंकण्याचा कितीही प्रयत्न केला, तरी तो स्वातंत्र्याचा सूर्य नभातून गर्जना करून हेच सांगेल की, काँग्रेस, समाजवादी आणि डाव्या विचारसरणीच्या लोकांनीच त्या स्वातंत्र्यासाठी लढा दिला होता.” असे संजय राऊत म्हणाले.
२०२३ मध्ये संसदेत महिला आरक्षण विधेयक एकमताने मंजूर झाले. मी पंतप्रधानांना विचारू इच्छितो की, २०२३ मध्ये मंजूर झालेले हे विधेयक अद्याप का लागू करण्यात आले नाही? जर त्यांनी लाल किल्ल्यावरून यावर भाष्य केले असते, तर आम्ही त्याचे स्वागत केले असते, असे राऊत म्हणाले.
📌 महत्वाच्या बातम्या
- ‘महाराष्ट्राची पुढची पिढी दुष्काळ पाहणार नाही’; CM फडणवीसांची मोठी घोषणा
- मुंब्रा नामांतरावर नितेश राणेंचा मोठा दावा; ‘नाव लवकरच जाहीर होईल’
- Pratap Sarnaik vs Kailas Patil: ठाकरे गटाचे आमदार कैलास पाटील ‘ऑपरेशन टायगर’च्या रडारवर? सरनाईकांच्या दाव्यानं खळबळ
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now











