Share

संजय राऊतांच्या शेजारी बसलेला ‘तो’ खासदारही फुटणार? ‘ऑपरेशन टायगर’मध्ये सर्वात मोठा ट्विस्ट

ठाकरे गटाचे ६ खासदार शिंदेंसोबत गेल्यानंतर आता संजय राऊतांच्या पत्रकार परिषदेत उपस्थित असलेला आणखी एक खासदार फुटणार असल्याची खळबळजनक माहिती शिवसेनेच्या नेत्यांनी दिली आहे.

Published On: 

Operation Tiger Sanjay Raut with Thackeray faction MPs at press conference

दिल्ली – संजय राऊतांच्या मांडीला मांडी लावून बसलेला तो निष्ठावंत खासदारही आता एकनाथ शिंदेंच्या गळाला लागलाय का? राज्यात सध्या या प्रश्नाने अक्षरशः राजकीय भूकंप घडवून आणला आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या ‘ऑपरेशन टायगर’ला (Operation Tiger) अखेर दिल्लीत मुहूर्त मिळाला आहे. एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटाचे तब्बल सहा खासदार फोडल्याची माहिती समोर आली आहे. बुधवारी सकाळी या सहा बंडखोर खासदारांनी थेट दिल्ली गाठत लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेतली. आपण स्वतंत्र गट स्थापन करत असल्याचं पत्र त्यांनी अध्यक्षांना दिलं. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, लोकसभा अध्यक्षांनी या नव्या गटाला तातडीने मंजुरीही दिली आहे. पक्षांतरबंदी कायद्याची दोन तृतीयांश बहुमताची अट पूर्ण होत असल्याने, हे सहा खासदार आता कोणत्याही कायदेशीर कारवाईविना लवकरच शिंदेंच्या शिवसेनेत अधिकृतपणे सामील होतील.

‘ऑपरेशन टायगर’मधील तो सातवा खासदार कोण?

पण खरी खळबळ उडाली आहे ती एका नव्या दाव्यामुळे. या सहा जणांशिवाय आणखी एक खासदार लवकरच शिंदे गटात जाणार असल्याची माहिती शिवसेनेच्या नेत्यांनी दिली आहे. विशेष म्हणजे, बुधवारी सकाळी संजय राऊत यांनी राजाभाऊ वाजे, अनिल देसाई आणि अरविंद सावंत यांच्यासोबत जी पत्रकार परिषद घेतली, त्याच बैठकीत हा संभाव्य बंडखोर खासदार उपस्थित होता.

शिवसेनेच्या सूत्रांनुसार, तब्बल तीन महिन्यांपूर्वीच खासदार राजाभाऊ वाजे शिंदे गटात येण्यास तयार झाले होते. काही तांत्रिक अडचणींमुळे तेव्हा हे ‘ऑपरेशन’ बारगळलं होतं. आता प्रत्यक्ष घडामोडींना वेग आला तेव्हा ऐनवेळी त्याने सोबत येण्यास नकार दिला आणि थेट राऊतांच्या पत्रकार परिषदेत हजेरी लावली. मात्र, येत्या दोन महिन्यांत हा नेता ठाकरेंची साथ सोडेल, असा दाट विश्वास शिंदे गटाला आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही