Share

Bhaskar Jadhav | “नारायण राणेंच्या तोंडात बळ अन् बाकी सगळं…”, भास्कर जाधवांची टोलेबाजी 

🕒 1 min readBhaskar Jadhav | मुंबई : आज उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत युतीची घोषण केली. संविधानाचे संरक्षण करण्यासाठी आम्ही एकत्र येत आहोत, असे उद्धव ठाकरेंनी यावेळी सांगितलं. यावरून केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांना डिवचलं. मुळात शिवशक्ती उरलीच कुठे, असा सवाल नारायण राणे … Read more

Published On: 

🕒 1 min read

Bhaskar Jadhav | मुंबई : आज उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत युतीची घोषण केली. संविधानाचे संरक्षण करण्यासाठी आम्ही एकत्र येत आहोत, असे उद्धव ठाकरेंनी यावेळी सांगितलं. यावरून केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांना डिवचलं. मुळात शिवशक्ती उरलीच कुठे, असा सवाल नारायण राणे यांनी केला. त्यांच्या या वक्तव्याचा समाचार घेत ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांनी टोलेबाजी केली आहे.

ते म्हणाले, “नारायण राणे हा शक्तीपात झालेला नेता आहे. स्वत: नारायणराव राणेंच्या तोंडात बळ अन् बाकी सगळं सिताफळ, अशी अवस्था आहे. त्यांना स्वत:ला निवडून येणं अवघड आहे. स्वत:च्या मुलाला निवडून आणता येत नाही. त्यामुळे त्यांनी दुसऱ्याची शक्ती राहिली की नाही राहिली, याचं मूल्यमापन करतात.”

“त्यांनी हे मूल्यमापन करावं म्हणजे हा महाराष्ट्रातला २०२३ मधला सर्वात मोठा विनोद आहे. त्याचबरोबर ते राजकारणात अजिबात महत्त्व न राहिलेले नेते असल्यामुळे त्यांच्याबद्दल काही बोलण्याची आवश्यकता नाही”, असा खोचक टोला भास्कर जाधव यांनी राणेंना लगावला.

नारायण राणेंचं वक्तव्य काय?

“राज्यात शिवशक्ती तर नाहीच. भीमशक्ति देशात आहे पण प्रकाश आंबेडकरकडे किती आहे? त्यानं किती दलितांची घरं बसवली ? मी सांगतो मी किती जणांची घरं बसवली”, असं वक्तव्य नारायण राणे यांनी केलं. उद्धव ठाकरे आणि वंचित आघाडी एकत्र आल्याने राज्याच्या राजकारणात काहीही फरक पडणार नाही, असंही नारायण राणे म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Maharashtra Marathi News Mumbai Politics

Join WhatsApp

Join Now

🕘 संबंधित बातम्या