Share

Sanjay Shirsat | “नातू आहे म्हणजे अक्कल आली असं होत नाही”; संजय शिरसाट यांची आदित्य ठाकरेंवर आगपाखड

Sanjay Shirsat | मुंबई : विधानभवनात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) याच्या तैलचित्राचे अनावरण करण्यात येणार आहे. मात्र ठाकरे गटाने याबाबत आपली नाराजी व्यक्त केली आहे. माजी मंत्री तथा ठाकरे गटातील नेते आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी तर ‘हे गद्दार लोक माझ्या तैलचित्राचे अनावरण करत आहेत, असे बाळासाहेब म्हणत असतील,’ असे वक्तव्य केले. यावरुन विरोधकांनी आदित्य ठाकरेंच्या त्या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे.

“नातू आहे म्हणजे अक्कल आली, असा त्याचा अर्थ होत नाही. आदित्य ठाकरे यांना कोणी गल्लीमध्येही विचारणार नाही”, अशी संतप्त प्रतिक्रिया संजय शिरसाट यांनी दिली आहे.

“हे पोरगं बाळासाहेबांच्या मांडीवरसुद्धा बसलेलं नाही. बाळासाहेब ठाकरे काय होते, हे याला माहिती नाही. नातू आहे म्हणजे अक्कल आली, असा अर्थ होत नाही. त्यांना थोडी तरी जनाची किंवा मनाची वाटायला हवी होती. माझ्या आजोबांचे तैलचित्र आज विधानभवनात लागत आहे, यावर त्यांनी विचार करायला हवा होता. राजकारण खड्ड्यात गेलं. ते तैलचित्र कोणी लावले हादेखील वेगळा मुद्दा आहे,” अशी प्रतिक्रिया संजय शिरसाट यांनी दिली आहे.

“माझ्या आजोबांचे नाव समृद्धी महामार्गाला लागत आहेत. माझ्या आजोबांच्या नावाने आज दवाखाना सुरू होतोय, असा विचार करून आदित्य ठाकरे यांना अभिमान वाटायला हवा. मात्र त्यांना तो कमीपणा वाटतोय. बाळासाहेब ठाकरे होते म्हणून लोक तुम्हाला आदित्य साहेब म्हणत आहेत. अशा लोकांना गल्लीमध्येही कोणी विचारणार नाही. साहेबांची पुण्याई आहे म्हणून तुमचे नाव आहे, हे त्यांनी लक्षात ठेवायला हवे,” असेही संजय शिरसाट म्हणाले आहेत.

“त्यांनी बोलताना भान बाळगले पाहिजे. आज बाळासाहेबांनी आम्हाला मोठे केले आहे. आदित्य ठाकरे यांना त्याची जाणीव नसेल. त्यांच्याच नावावर तुम्ही जगत आहात. तैलचित्रामुळे त्यांना वाईट वाटत आहे का? तसे आदित्य ठाकरे यांनी स्पष्टपणे सांगावे. बाळासाहेब ठाकरे त्यांचे आजोबा नाहीत. ते आमचे शिवसेनाप्रमुख आहेत. म्हणूनच आम्ही त्यांच्यासाठी काहीही करू,” असे सांगत संजय शिरसाट यांनी आदित्य ठाकरेंवर आगपाखड केली आहे.

महत्वाच्या बातम्या

Sanjay Shirsat | मुंबई : विधानभवनात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) याच्या तैलचित्राचे अनावरण करण्यात येणार आहे. मात्र ठाकरे गटाने …

पुढे वाचा

Maharashtra Marathi News Mumbai Politics