Share

ठाकरे गटाचे ६ खासदार नॉट रिचेबल; एकनाथ शिंदेंच्या ‘ऑपरेशन टायगर’मुळे महाराष्ट्रात पुन्हा मोठा भूकंप?

वर्धापन दिनापूर्वी ठाकरेंचे ६ खासदार दिल्लीत नॉट रिचेबल झाले असून एकनाथ शिंदे पाठिंब्याचं पत्र देण्यासाठी दिल्लीला रवाना झाले आहेत.

Published On: 

Eknath Shinde Delhi visit amid Shiv Sena Thackeray faction MPs split rumors.

मुंबई (Shiv Sena) – शिवसेनेच्या वर्धापन दिनापूर्वीच ठाकरे गटाचे तब्बल सहा खासदार दिल्लीत अचानक ‘नॉट रिचेबल’ झाले आहेत? महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या थरार सुरू झाला असून उद्धव ठाकरेंसमोर आपले खासदार टिकवण्याचं मोठं संकट उभं ठाकल्याची चिन्हं दिसत आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः दिल्लीला रवाना झाले असून ते लोकसभा अध्यक्षांची भेट घेऊन त्यांना पाठिंब्याचं थेट पत्र देण्याची शक्यता आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ठाकरेंच्या नऊपैकी सहा खासदारांना आपल्या बाजूला खेचण्यासाठी शिंदेंनी ‘ऑपरेशन टायगर’ नावाचा एक मोठा गेम प्लॅन आखला आहे.

एकनाथ शिंदे दिल्लीत दाखल, ठाकरे गटात पुन्हा मोठी फूट?

या मोठ्या घडामोडींमुळे दिल्लीतील राजकीय वातावरण कमालीचं तापलंय. शिंदेंच्या शिवसेनेतले केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी तातडीने लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली, त्यामुळे या संभाव्य बंडाच्या चर्चांना अधिकच बळ मिळालंय.

सूत्रांनुसार, बंडाच्या वाटेवर असलेल्या खासदारांमध्ये नागेश पाटील आष्टीकर, संजय जाधव, संजय देशमुख, भाऊसाहेब वाकचौरे आणि ओमराजे निंबाळकर या पाच नावांची जोरदार चर्चा सुरू आहे. मात्र, शिंदेंना साथ देणारा ठाकरेंचा सहावा खासदार नेमका कोण, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

दुसरीकडे, ठाकरेंच्या गोटात या भूकंपाचे पडसाद उमटायला सुरुवात झाली असून त्यांचे उरलेले तीन शिलेदारही दिल्लीत दाखल झाले आहेत. संजय राऊत, अरविंद सावंत आणि अनिल देसाई हे नेते तातडीने कायदेशीर सल्ला घेण्यासाठी दिल्लीत कायदेतज्ज्ञांच्या संपर्कात असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

बंडखोर खासदारांच्या सह्यांचं पत्र आधीच तयार असल्याच्या दाव्यांमुळे शिवसेना कोणाची यावरून पुन्हा एकदा दिल्लीत कायदेशीर लढाई सुरू होण्याची शक्यता नाकारता येत नाही. दोन दिवसांवर आलेल्या वर्धापन दिनाआधीच शिंदेंचा हा ‘टायगर’ ठाकरेंना लोकसभेत गारद करणार का, याकडे आता संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलंय.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही