Share

पंजाबराव डख यांची मोठी भविष्यवाणी; यंदा दुष्काळ नाही तर तुफान पाऊस कोसळणार, पाहा तुमच्या भागात कधी येणार मान्सून?

हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी पावसाबाबत नवा अंदाज वर्तवला असून, लवकरच राज्यात तुफान पाऊस होईल आणि दुष्काळाची चिंता मिटेल असा दावा केला आहे.

Published On: 

Panjabrao Dakh Monsoon Update - Farmer looking at cloudy sky waiting for heavy rain

राज्यात एल निनोच्या धोक्यामुळे यंदा दुष्काळ पडणार का, याच चिंतेत सध्या बळीराजा आकाशाकडे डोळे लावून बसलाय. मान्सूनची गाडी मध्येच अडकल्याने अनेक ठिकाणी पेरण्या खोळंबल्यात. पण आता चिंतेत असलेल्या शेतकऱ्यांसाठी एक मोठी आणि सुखद बातमी समोर आली आहे.

हवामान अभ्यासक पंजाबराव डख (Panjabrao Dakh) यांनी पावसाबाबत एक नवा आणि अतिशय महत्त्वाचा अंदाज वर्तवला आहे. यंदा राज्यात दुष्काळाचे कोणतेही सावट नसून, लवकरच नद्या-नाले भरून वाहतील असा तुफान पाऊस पडणार असल्याचा मोठा दावा त्यांनी केलाय.

Panjabrao Dakh Monsoon Update

सध्या पाऊस दडी मारून बसला असला तरी शेतकऱ्यांनी घाबरून जाऊ नये, असं आवाहन डख यांनी केलंय. त्यांच्या अंदाजानुसार, जूनच्या शेवटच्या आठवड्यात राज्यात पेरणीयोग्य पाऊस होईल.

जुलैमध्ये मुसळधार तर ऑगस्टमध्ये पावसाचा जोर थोडा कमी राहील. पण, सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात परतीचा पाऊस अक्षरशः धुमाकूळ घालेल. राज्यातील पावसाच्या वेळापत्रकाबाबत बोलताना ते म्हणाले की, १८ जूनपासून पूर्व विदर्भात पावसाला दमदार सुरुवात होईल.

त्यानंतर २० ते २१ जून दरम्यान मराठवाड्यात पावसाची एन्ट्री होईल आणि २९ जूनपर्यंत तिथे वेगवेगळ्या भागात पाऊस पडेल. विदर्भातही १८ ते १९ जूनपासूनच चांगल्या पावसाची शक्यता आहे. दुसरीकडे, उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रात २३ ते २९ जून या काळात पावसाला सुरुवात होईल. त्यामुळे शेतकऱ्यांनी कोणतीही भीती न बाळगता पेरणीची तयारी करावी.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आणि हवामानाच्या बदलत्या स्थितीनुसार, १९ जूननंतर उन्हाचा चटका कमी होऊन राज्यात सर्वत्र ढगाळ वातावरण निर्माण होईल, असा विश्वासही पंजाबराव डख यांनी व्यक्त केला आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही