Share

Maharashtra Weather Update: पावसाची दडी संपणार! राज्यात ‘या’ तारखेपासून पुन्हा धो-धो बरसणार

अफगाणिस्तानाकडून येणाऱ्या वाऱ्यांचा प्रभाव कमी होत असून, राज्यात २० जुलैपासून मुंबई, पुण्यासह १३ हून अधिक जिल्ह्यांत पुन्हा धो-धो पाऊस कोसळणार आहे.

Published On: 

Heavy rain alert in Maharashtra IMD weather update

Maharashtra Weather Update: गेल्या काही दिवसांपासून भर पावसाळ्यात पावसाने अचानक दडी का मारली, असा प्रश्न तुम्हालाही पडलाय का? अफगाणिस्तानकडून येणाऱ्या वाऱ्यांमुळे मान्सूनच्या प्रवासात मोठा अडथळा निर्माण झाल्याचे आता समोर आले आहे. पण आता चिंता सोडा, कारण पावसाचा हा ब्रेक लवकरच संपणार असून शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

हवामान विभागाने दिलेल्या नव्या इशाऱ्यानुसार, येत्या २० जुलैपासून संपूर्ण राज्यात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढणार आहे. सद्यस्थितीत आज सोलापूर, धाराशिव आणि कोकण पट्ट्यातील काही भागांना पावसाचा ‘येलो अलर्ट’ देण्यात आला आहे. यामुळे पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या बळीराजाच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या आहेत.

Maharashtra Weather Update 

हवामान तज्ज्ञांच्या मते, बिहार आणि पूर्व उत्तर प्रदेशात समुद्रसपाटीपासून ९०० किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती निर्माण झाली आहे. दुसरीकडे, डेहराडून, पाटणा ते बांकुरापर्यंत कमी दाबाचा पट्टा जोरदार सक्रिय आहे. त्यामुळेच राज्यात पावसाला पुन्हा एकदा पोषक वातावरण तयार होत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पुढील दोन ते तीन दिवसांत अफगाणिस्तानातून येणाऱ्या या कोरड्या हवेचा प्रभाव ओसरेल आणि मान्सून पुन्हा आपल्या ट्रॅकवर येईल.

येत्या २० जुलैपासून मुंबई, ठाणे, पालघर, रायगड आणि रत्नागिरीत पावसाचा धुमाकूळ पाहायला मिळेल. यासोबतच मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातही हवामान बदलणार आहे. नाशिक, पुणे, अहिल्यानगर, सांगली ते थेट लातूर, बीड, नांदेड, परभणी आणि हिंगोली या जिल्ह्यांमध्येही विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे.

जुलैच्या पहिल्याच आठवड्यात मुंबई आणि उपनगरात पावसाने अक्षरशः झोडपून काढले होते. जूनची सर्व कसर अवघ्या चार-पाच दिवसांत भरून काढत पावसाने जुलै महिन्याची सरासरीही ओलांडली होती. मागील काही दिवसांच्या विश्रांतीनंतर आता पुन्हा एकदा पावसाचा हाच जोर पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही