बिग बॉसच्या नव्या पर्वाची चाहूल, उर्फी जावेदपासून ‘कच्चा बदाम’ गर्लपर्यंत कोण मारणार बाजी?

बिग बॉस सीजन 20 ची जोरदार तयारी सुरू असून, 21 सप्टेंबरपासून शूटिंग सुरू होण्याची शक्यता आहे. स्पर्धकांच्या संभाव्य यादीत अनेक प्रसिद्ध नावे आहेत.

Published On: 

Bigg Boss 20 Contestants - Salman Khan hosting the upcoming reality show season

सलमान खानचा ‘बिग बॉस’ आणि वाद हे जणू एक समीकरणच बनलंय. आता यंदाच्या विसाव्या सीजनमध्ये कोणकोणते मोहरे टीव्हीवर राडा घालणार, याची उत्सुकता तुम्हालाही लागलीये ना?

छोट्या पडद्यावरील या सर्वात मोठ्या रिॲलिटी शोच्या नव्या पर्वाची जोरदार तयारी सुरू झालीय. मीडिया रिपोर्ट्सनुसार, येत्या २१ सप्टेंबर रोजी खुद्द भाईजान सलमान खान ‘बिग बॉस २०’ (Bigg Boss 20) च्या शूटिंगचा श्रीगणेशा करणार आहे.

Bigg Boss 20 Contestants

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, यंदाच्या सीजनसाठी स्पर्धकांची एक तगडी संभाव्य यादी समोर आली आहे. यात सोशल मीडियावरील ओळखीचे चेहरे आणि काही वादग्रस्त नावांचा समावेश आहे. सर्वांचं लक्ष वेधून घेणारं नाव म्हणजे आपल्या अतरंगी फॅशनसाठी ओळखली जाणारी मॉडेल उर्फी जावेद; ती या शोमध्ये धमाकेदार एंट्री घेऊ शकते.

दुसरीकडे, ‘कच्चा बदाम’ फेम अंजली अरोरा आणि प्रसिद्ध कंटेंट क्रिएटर फैसल शेख यांचीही नावे आघाडीवर आहेत. तसेच, सध्या चर्चेत असलेला अरबाज पटेल आणि भाव्या सिंह यांच्या नावाचीही टीव्ही वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे.

या दिग्गज नावांसोबतच सेंटी शर्मा, रिद्धिमा गुप्ता, जन्नत जुबैर, भागीरथ भट्ट, रुरु ठाकूर, आवेज दरबार आणि तुषार करवार यांनाही विचारणा झाल्याचं बोललं जातंय.

अद्याप या नावांवर चॅनेलकडून कोणतीही अधिकृत पुष्टी झालेली नाही. याबाबत अधिक माहिती हाती आल्यावर बातमी अपडेट केली जाईल. पण जर हीच मंडळी घरात गेली, तर यंदाचा सीजन चांगलाच गाजणार हे नक्की!

📌 महत्वाच्या बातम्या

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
Maharashtra Desha

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही