Share

Ram Mandir Donation Case: चंपत राय आणि अनिल मिश्रांचा राम मंदिर ट्रस्टमधून राजीनामा

राम मंदिर दान प्रकरणाच्या एसआयटी तपासादरम्यान चंपत राय आणि अनिल मिश्रा यांच्या राजीनाम्याची माहिती समोर आल्याने प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे.

Published On: 

Ayogya Ram Janmabhoomi

अयोध्या : श्री राम मंदिर (Shree Ram Mandir) दान प्रकरणात मोठी घडामोड समोर आली आहे. श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे प्रमुख सदस्य चंपत राय (Champat Roy) आणि अनिल मिश्रा (Anil Mishra) यांनी राजीनामा दिल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणाच्या चौकशीसाठी स्थापन करण्यात आलेल्या एसआयटीच्या (SIT) प्राथमिक अहवालानंतर ही कारवाई झाल्याची चर्चा आहे. एसआयटीकडून कथित आर्थिक गैरव्यवहाराच्या आरोपांची चौकशी सुरू असून, व्यवहार, बँक खाती, मालमत्ता आणि संबंधित व्यक्तींच्या संपर्कांची तपासणी केली जात आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, एसआयटीच्या प्राथमिक अहवालात काही महत्त्वाच्या शिफारशी करण्यात आल्या आहेत. त्यानंतर या प्रकरणात पहिला एफआयआर दाखल करण्यात आला असून तपास अधिक वेगाने सुरू आहे. राम मंदिर दान प्रकरणात श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे विश्वस्त कृष्ण मोहन (Krushna Mohan) यांच्या तक्रारीवरून आठ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात अपहार, फसवणूक आणि कट रचल्याच्या आरोपांखाली गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.

एफआयआरमध्ये राम शंकर यादव उर्फ टिनू, अनुकल्प मिश्रा, लवकुश मिश्रा, करुणेश पांडे, अविनाश शुक्ला, मनीष यादव, राम शंकर मिश्रा आणि सुभाष चंद्र श्रीवास्तव यांची नावे आहेत. पोलिसांनी आतापर्यंत काही आरोपींना अटक केली असून, इतर आरोपींचा शोध सुरू आहे. एसआयटीच्या अंतिम अहवालानंतर या प्रकरणात आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, या संपूर्ण प्रकरणामुळे राम मंदिर ट्रस्टच्या कामकाजावर आणि दान व्यवस्थापनावर प्रश्न उपस्थित झाले आहेत. पुढील तपासात आणखी कोणती माहिती समोर येते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

📌 महत्त्वाच्या बातम्या

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही