राम मंदिर प्रकरणावर RSS ची स्पष्ट भूमिका! ‘हिंदू समाजाने अफवांना बळी पडू नये’

राम मंदिरातील कथित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी RSS ने प्रथमच अधिकृत भूमिका मांडत दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आणि हिंदू समाजाला संयम राखण्याचे आवाहन केले.

Published On: 

RSS

RSS on Ram Mandir : राम मंदिरातील (Ram Mandir) कथित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने (RSS) प्रथमच अधिकृत भूमिका जाहीर केली आहे. संघाचे सरकार्यवाह दत्तात्रेय होसबळे (Dattatreya Hosabale) यांनी या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी करत हिंदू समाजाला संयम राखण्याचे आवाहन केले.

दत्तात्रेय होसबळे म्हणाले की, श्रीराम जन्मभूमीवर उभारलेले भव्य मंदिर हे अनेक पिढ्यांच्या संघर्ष, त्याग आणि कोट्यवधी रामभक्तांच्या श्रद्धेचे प्रतीक आहे. त्यामुळे मंदिरातील कथित गैरव्यवहारामुळे संपूर्ण हिंदू समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या असून ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे.

ते पुढे म्हणाले की, श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र न्यासाच्या विनंतीनंतर उत्तर प्रदेश सरकारने विशेष तपास पथक (SIT) स्थापन केले आहे. या प्रकरणातील तपास कायदेशीर पद्धतीने सुरू असून तपासात जे कोणी दोषी आढळतील त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे, अशी संघाची स्पष्ट भूमिका आहे.

मंदिर न्यासाने या घटनेतून धडा घेत आर्थिक व्यवस्थापन आणि प्रशासकीय प्रक्रियेत आवश्यक सुधारणा कराव्यात, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी पारदर्शक आर्थिक व्यवस्था आणि शिस्तबद्ध प्रशासन आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.

यासोबतच त्यांनी हिंदू समाजाला कोणत्याही अफवा किंवा दिशाभूल करणाऱ्या प्रचारावर विश्वास ठेवू नये, असे आवाहन केले. समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या शक्तींना यशस्वी होऊ देऊ नये, असेही त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, या प्रकरणात विशेष तपास पथक (SIT) श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टच्या गेल्या पाच वर्षांतील आर्थिक व्यवहारांचे फेरऑडिट करणार आहे. प्राथमिक तपासात आर्थिक अनियमिततेचे संकेत मिळाल्यानंतर दानातून प्राप्त झालेली रक्कम तसेच सोने, चांदी आणि इतर मौल्यवान वस्तूंचीही सखोल पडताळणी केली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही