Share

‘तिरंग्याचे प्रेम आता जागे झाले!’ हर्षवर्धन सपकाळांचा BJP-RSS वर जोरदार हल्लाबोल

हर्षवर्धन सपकाळ यांनी तिरंगा मुद्द्यावर भाजप-आरएसएसवर निशाणा साधत ‘देर आये दुरुस्त आये’ म्हणत त्यांच्या भूमिकेवर सवाल उपस्थित केला.

Published On: 

Harshwardhan Sapkal attacks BJP-RSS over Tiranga

मुंबई : महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ (Harshwardhan Sapkal) यांनी भाजप (BJP) आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) यांच्यावर जोरदार टीका केली आहे. अनेक वर्षे तिरंग्याला विरोध करणाऱ्या RSSचे तिरंग्याबद्दलचे हे नव्याने निर्माण झालेले प्रेम स्वागतार्ह असले, तरी त्यामागे कोणताही राजकीय डावपेच नसावा, असे सपकाळ यांनी म्हटले आहे.

टिळक भवन येथे हर्षवर्धन सपकाळ यांच्या अध्यक्षतेखाली काँग्रेसच्या कोअर कमिटीची बैठक झाली. या बैठकीत संघटनात्मक परिस्थितीचा आढावा घेण्यात आला आणि राज्यातील राजकीय व सामाजिक मुद्द्यांवर चर्चा झाली. तसेच, पक्षाच्या पुढील रणनीतीबाबतही विचारविनिमय करण्यात आला.

यापुढे दर महिन्याला अशा बैठका घेण्याचा निर्णय घेण्यात आला. ‘BLA’ (बूथ लेव्हल एजंट्स) च्या मुद्द्यावरही चर्चा झाली. यावेळी सपकाळ यांनी सांगितले की, काँग्रेसने आतापर्यंत ६५ हजार ‘BLA-2’ नियुक्त केले आहेत.

Harshwardhan Sapkal attacks BJP-RSS over Tiranga

भाजपची मातृसंस्था असलेल्या RSSने अनेक वर्षे राष्ट्रध्वजाला (तिरंग्याला) विरोध केला होता. त्यांनी तिरंग्याला अपशकूनी मानले होते आणि स्वातंत्र्यलढ्यात त्यांचा कोणताही सहभाग नव्हता.

इतकेच नव्हे तर स्वातंत्र्यानंतर ५०-५५ वर्षे RSSने आपल्या कार्यालयांवर तिरंगाही फडकवला नव्हता. तिरंग्याबद्दलची त्यांची सध्याची ओढ स्वागतार्ह असली. ‘देर आये दुरुस्त आये’, ” असे म्हणता येईल, तरीही या बदलामागे कोणताही छुपा राजकीय हेतू नसावा, यावर महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी भर दिला.

‘फोडा आणि राज्य करा’

माध्यमांशी बोलताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ पुढे म्हणाले, “भारतीय जनता पक्षाचे सरकार सर्व पातळ्यांवर अपयशी ठरले असून सरकारमध्ये भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात बोकाळला आहे, महागाई वाढली आहे, शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत, बेरोजगारीचा प्रश्न आहे, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आहे, पण सरकार त्याकडे लक्ष देत नाही.”

“जनतेच्या प्रश्नांवरून लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी जातीपातीच्या व धर्माच्या नावावर द्वेष पसरवला जात आहे. ‘फोडा आणि राज्य करा’ या नितीप्रमाणे भाजपाचे काम सुरु आहे. परंतु भाजपा महायुती सरकारचा हा डाव काँग्रेस हाणून पाडेल व जनतेच्या प्रश्नावर सरकारला जाब विचारण्यासाठी आंदोलनात्मक भूमिका घेईल.” असे सपकाळ यांनी सांगितले.

झारखंड मधील विद्यार्थी आंदोलनासंदर्भात भाजपच्या खासदारांनी संसद परिसरात आंदोलन केले. यावर विचारलेल्या प्रश्नावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले की, “भाजपाचे हे आंदोलन हास्यापद आहे.”

पुढे ते म्हणाले की, “दिल्लीत जंतरमंतरवर व देशभर पेपरफुटीच्या प्रश्नावर तरुणांनी मोठे आंदोलन केले, असता त्यांच्यावर अमानुष पद्धतीने लाठीहल्ला केला, पॅलेट गन चालवल्या गेल्या, शेकडो विद्यार्थ्यांवर गुन्हे दाखल केले, मुलींना अत्यंत वाईट वागणूक दिली, त्यावेळीच भाजपाच्या खासदारांनी असे आंदोलन करायला हवे होते.

मोदी-शहा हेच पळून जाणारे नेते

पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष म्हणाले, “राहुल गांधी हे पळून जाणारे नेते नाहीत. ते लढवय्ये आहेत. विद्यार्थ्यांवरील लाठीमाराबाबत संसदेत चर्चा व्हावी, अशी मागणी विरोधी पक्ष सातत्याने करत आहे. तरीही पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा अशा चर्चेत सहभागी होण्यास घाबरत आहेत.”

“१२ वर्षात एकही पत्रकार परिषद न घेणारे पंतप्रधान व चर्चेपासून पळ काढणारे अमित शाह हेच खरे पळपुटे आहेत.” असा टोला हर्षवर्धन सपकाळ यांनी लगावला.

📌 महत्वाच्या बातम्या

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी महाराष्ट्र देशाच्या उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही