Share

‘पक्षघटना संवैधानिक की असंवैधानिक हे कोण ठरवणार?’ संजय राऊतांचा थेट सवाल

कपिल सिबल यांच्या युक्तिवादानंतर संजय राऊत यांनी निवडणूक आयोगाच्या निर्णयावर गंभीर प्रश्न उपस्थित करत सर्वोच्च न्यायालयाकडून न्याय मिळण्याचा विश्वास व्यक्त केला.

Published On: 

Sanjay Raut after Shiv Sena Supreme Court hearing

Sanjay Raut : शिवसेना पक्षाचे नाव आणि निवडणूक चिन्ह यांच्या मालकी हक्काबाबतच्या वादावर आज सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) सुनावणी झाली. ‘शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)’ गटाच्या वतीने ज्येष्ठ वकील कपिल सिबल (Kapil Sibal) यांनी युक्तिवाद केला. निवडणूक आयोगाने ज्या पद्धतीने पक्ष आणि चिन्ह एकनाथ शिंदे यांना दिले, त्याबाबत त्यांनी प्रश्न उपस्थित केले. आजचा युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी एक महत्त्वपूर्ण विधान केले.

न्याय मिळण्याबाबत विश्वास

निवडणूक आयोगाच्या निर्णयांवर कपिल सिबल यांनी घेतलेल्या आक्षेपांबाबत बोलताना राऊत यांनी नमूद केले की, “हे एक घटनापीठ आहे. या घटनापीठाकडे येणारे खटले हे अनेक कलमांची व्याख्या करणारे असतात. संविधानाच्या एखाद्या कलमाचा भंग झाला असेल आणि त्याच्या विरोधात निर्णय दिला असेल तर त्या संदर्भात सुनावणी होत आहे.”

Sanjay Raut after Shiv Sena Supreme Court hearing

म्हणाले की, “शिवसेनेच्या प्रकरणात पावला पावलावर संविधान आणि घटनेचा भंग झाला आहे. त्यामुळे आज कपिल सिबल यांनी संविधानाच्या दृष्टीने बाजू मांडली. याद्वारे त्यांनी निवडणूक आयोगाच्या निर्णयाची पिसं काढली. निवडणूक आयोगाची प्रत्येक स्टेप ही कशी चुकली, याचं विवेचन सिबल यांनी केलं ते ऐतिहासिक आहे.”

“हे भविष्यातील निकालासाठी माईलस्टोन असेल असा युक्तिवाद सिबल यांनी खऱ्या शिवसेनेच्या आणि उद्धव ठाकरेंच्या वतीने केला. आम्ही सगळे समाधानी आहोत, आम्हाला आता न्याय मिळेल असा आत्मविश्वास वाटत आहे. आमचा कोर्टावर विश्वास आहे.” असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला.

सिबल यांच्या युक्तिवादावर भाष्य

पक्षाची घटना ही असंवैधानिक आहे असं सरन्यायाधीशांनी म्हटलं, यावर तुम्ही कशाच्या आधारे घटना संवैधानिक की असंवैधानिक ठरवणार? या प्रश्नाबाबत हा मुद्दा निर्णायक ठरेल का? या प्रश्नावर बोलताना राऊत यांनी म्हटले की, “मला असं वाटत नाही. या मुद्द्यावरही कपिल सिबल यांनी युक्तिवाद केला आहे. हा विषय त्यांनी समजावून सांगितलेला आहे.”

“2018 साली ज्या गाईडलाईन्स निवडणूक आयोगाने दिल्या होत्या, त्याचं उल्लंघन आम्ही केलेले नाही. मात्र पक्ष सोडून गेलेल्या लोकांनी त्याचं उल्लंघन केलेले आहे, हे आम्ही कोर्टासमोर मांडलं आहे. आपण एका ऐतिहासिक निर्णयाकडे चाललो आहे. पक्षफुटीसंदर्भात, पक्षांतर बंदी कायद्यासंदर्भात जी बजबजपुरी या देशात माजलेली आहे, त्या दृष्टीने हे घटनापीठ ऐसिहासिक निर्णय देईल, अशी आशेची किरणं आज तरी आम्हाला दिसत आहेत.” असं मत राऊत यांनी व्यक्त केले.

कपिल सिबल यांनी असा युक्तिवादही केला की, पक्षाचे चिन्ह आणि खुद्द पक्षच दुसऱ्या व्यक्तीला बहाल करण्याचा अधिकार निवडणूक आयोगाला नाही. यावर भाष्य करताना राऊत म्हणाले की, सिबल यांनी एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केला आहे. तो अधिकार निवडणूक आयोगाला नाही.

सिबल यांनी न्यायालयासमोर कलम २९ च्या संदर्भात युक्तिवाद मांडले आहेत आणि देशात घडलेल्या चुकीच्या पद्धतीने झालेल्या पक्षांतरांच्या घटनांकडे लक्ष वेधले आहे. परिणामी, आम्हाला आशेचा किरण दिसत आहे, असेही राऊत म्हणाले.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही