Share

‘हडप्पा संस्कृतीतील प्राणी…’; बावनकुळेंवर जरांगेंची बोचरी टीका, आता लक्ष्मण हाकेही मैदानात!

मनोज जरांगे पाटील यांनी सोलापूर दौऱ्यात चंद्रशेखर बावनकुळेंच्या व्यंगावर खोचक टीका केली आहे. यावर ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी संताप व्यक्त करत थेट आव्हान दिले आहे.

Published On: 

Manoj Jarange Patil criticizes Chandrashekhar Bawankule as OBC leader Laxman Hake protests

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून दौऱ्यावर असलेल्या जरांगेंनी थेट मंत्र्यांच्या व्यंगावरच निशाणा साधला आहे. सध्या त्यांचं हे विधान चांगलंच चर्चेत आलंय. पंढरपूर तालुक्यातील सरकोली येथे त्यांची मोठी सभा पार पडली. यावेळी त्यांनी भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर अतिशय बोचरी आणि वैयक्तिक टीका केली. कुणबी नोंदी रद्द करण्याच्या मुद्द्यावरून त्यांनी बावनकुळेंना थेट टार्गेट केलंय.

जरांगे पाटील म्हणाले, “बावनकुळे हे नाव मी कधीच ऐकलं नाही, मी मुळव्याध ऐकलाय. आमचं कुळ शहाण्णवकुळी आहे, मग हे बावनकुळ कुठून आलं?” एवढ्यावरच ते थांबले नाहीत. बावनकुळे नावाचा प्राणी हडप्पा, मोहेंजोदारो आणि अजिंठा लेणीसारखा दिसतो, अशी खोचक टिप्पणी त्यांनी केली.

गेलं वर्षभर आपण देवेंद्र फडणवीस यांच्यावर बोललो नाही. पण बावनकुळे जर आमची प्रमाणपत्रं रद्द करणार असतील, तर आम्ही शांत बसणार नाही. असा स्पष्ट इशारा जरांगेंनी दिला. तुम्हाला तुमचा नेता प्रिय असेल, पण आमची जात आणि समाज हाच आमचा बाप आहे. असंही ते ठणकावून म्हणाले.

दुसरीकडे, बावनकुळेंनी हे सर्व आरोप फेटाळून लावत आपण नार्को टेस्टसाठीही तयार असल्याचं म्हटलं आहे. पण या सगळ्या वादानंतर आता ओबीसी नेते लक्ष्मण हाके मैदानात उतरलेत.

जरांगे मूर्खासारखा धिंगाणा घालत असून मुख्यमंत्र्यांची आणि मंत्र्यांची वैयक्तिक निंदा करत आहेत, असा संताप त्यांनी व्यक्त केलाय. थोडक्यात सांगायचं तर, जरांगेंना रोखण्यासाठी हाके ओबीसी बांधवांची मोठी मोट बांधणार आहेत. त्यामुळे आता मराठा विरुद्ध ओबीसी हा संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी महाराष्ट्र देशाच्या उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही