मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या ताफ्याला अचानक अपघात झाला आहे. दोन ते तीन गाड्या एकमेकांवर आदळल्या. या जोरदार धडकेत काही कार्यकर्ते जखमी झालेत.
ही घटना सांगली जिल्ह्यातील विटा शहरात घडली. कडेगावकडून विट्याकडे येताना हा अपघात झाला. स्वागतासाठी रस्त्यावर प्रचंड गर्दी होती. त्याचवेळी हा गोंधळ उडाला.
Manoj Jarange Patil Convoy Accident
अपघात होताच जरांगे पाटील यांनी तत्काळ गाडी थांबवली. जखमी कार्यकर्त्यांना त्यांनी लगेच स्वतःच्या कारमध्ये बसवलं. आणि त्यांना घेऊन ते थेट रुग्णालयात पोहोचले.
सध्या जखमींवर उपचार सुरू आहेत. पण हा अपघात नेमका कशामुळे आणि कसा झाला, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. याबाबत अधिक माहिती हाती आल्यावर बातमी अपडेट केली जाईल.
📌 महत्वाच्या बातम्या
- ‘विद्यार्थ्यांना शत्रूसारखे मारले’; झारखंड आंदोलनावर आशिष शेलारांचे मोठे विधान
- नवी मुंबईत ‘क्लस्टर’वरून राजकीय रणकंदन; भाजप म्हणाले, ‘एक वीटही रचू देणार नाही’
- मुंबईत राजकीय सस्पेन्स वाढला; ‘हा’ सदस्य अजून ठाकरे गटातच… मग शिंदे गटाच्या बैठकीत कसा?
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now












