प्रतिनिधी, 2 ऑक्टोबर: सणासुदीच्या काळात साखरेच्या वाढत्या (sugar price) किमतींवर नियंत्रण मिळवण्यासाठी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. सरकारने साखरेच्या साठ्यावर (Sugar Stock News) मर्यादा घातली असून, आता व्यापाऱ्यांना केवळ १००० क्विंटलपर्यंतच साखरेचा साठा ठेवता येणार आहे. या नव्या निर्णयामुळे साखरेच्या दरात मोठी घट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
नवीन नियमानुसार, साखरेची ही साठा मर्यादा १५ ऑक्टोबर ते ३० नोव्हेंबर २०२६ या कालावधीसाठी लागू राहणार आहे. देशभरातील व्यापाऱ्यांसाठी १००० क्विंटलची मर्यादा असली तरी, कोलकाता व त्याच्या आसपासचा विस्तारित महानगरीय परिसर आणि आसाम या राज्यांसाठी २००० क्विंटलची विशेष मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. तसेच, व्यापाऱ्यांना आता जास्तीत जास्त १५ दिवसांसाठीच साखरेचा साठा करण्याची परवानगी असेल.
sugar price and Sugar Stock News
बाजारातील अनावश्यक साठेबाजी, सट्टेबाजी आणि साखरेचा अतिरिक्त साठा रोखणे हा या निर्णयामागील मुख्य उद्देश असल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे. साखरेचे प्रमाण आणि साठवणुकीचा कालावधी मर्यादित केल्याने साखर कारखान्यांकडून व्यापाऱ्यांपर्यंत आणि तिथून ग्राहकांपर्यंत साखरेचा पुरवठा सुरळीत होण्यास मदत मिळणार आहे.
यापूर्वी ऑगस्ट महिन्यात सरकारने व्यापाऱ्यांसाठी ४००० क्विंटल साखरेची आणि जास्तीत जास्त ३० दिवसांसाठी साठा मर्यादा लागू केली होती. त्यानंतर १५ सप्टेंबर रोजी ती २००० क्विंटल करण्यात आली, आणि आता १५ ऑक्टोबरपासून ती आणखी कमी करून १००० क्विंटल करण्यात आली आहे. दरम्यान, ऑगस्ट महिन्यातच साखरेच्या सरासरी किरकोळ किमतीत सुमारे १५ टक्के, तर कारखान्यांकडून मिळणाऱ्या एक्स-मिल किमतीत सुमारे २८ टक्क्यांची घट झाली आहे. गेल्या तीन महिन्यांपासून साखरेचे दर स्थिर असल्याचे पाहायला मिळत आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- बिस्लेरीने अंघोळ, लाखो रुपयांचा खर्च आणि आजार; ट्रोलर्सवर भडकली जान्हवी किल्लेकर
- ललित प्रभाकरला ‘कसाब’च्या भूमिकेत पाहून प्राजक्ता माळीची खास पोस्ट; म्हणाली, ‘मला तू आदित्यपेक्षा…’
- महिलेची अश्लील बदनामी; आमदार विलास भुमरेंचे निकटवर्तीय भाऊसाहेब तरमळेला अटक, दोन दिवसांची पोलीस कोठडी
Quick Answers
सरकारने साखरेच्या साठ्यावर मर्यादा घातली असून व्यापाऱ्यांना आता केवळ १००० क्विंटलपर्यंतच साखरेचा साठा ठेवता येणार आहे.
साखरेची ही साठा मर्यादा १५ ऑक्टोबर ते ३० नोव्हेंबर २०२६ या कालावधीसाठी लागू राहणार आहे.
बाजारातील अनावश्यक साठेबाजी, सट्टेबाजी आणि साखरेचा अतिरिक्त साठा रोखणे हा या निर्णयामागील मुख्य उद्देश आहे.
टीप: खालील झटपट उत्तरे AI च्या सहाय्याने तयार करण्यात आली असून ती वरील मूळ बातमीतील माहितीनुसार आहेत. अधिक संदर्भासाठी संपूर्ण बातमी वाचा.
Ask Maharashtra Desha
आधी महाराष्ट्र देशाच्या उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.









