Share

‘हर घर तिरंगा’साठी PM मोदींचा नवा व्हिडीओ; देशवासीयांना केलं मोठं आवाहन

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ‘हर घर तिरंगा’ मोहिमेत सहभागी होऊन प्रत्येक घरावर तिरंगा फडकवण्याचे आवाहन केले.

Published On: 

PM Narendra Modi new Har Ghar Tiranga video

PM Narendra Modi New Video: पंतप्रधान नरेंद्र मोदी ( PM Narendra Modi)  विविध माध्यमांतून तरुणांशी संवाद साधत आहेत. गेल्या काही दिवसांपासून ते इन्स्टाग्राम, फेसबुक आणि इतर सोशल मीडिया (Social Media) प्लॅटफॉर्मवर व्हिडिओ पोस्ट करत आहेत.

प्रत्येक व्हिडिओमध्ये ते देशातील नागरिक आणि तरुणांना एक विशेष संदेश देतात. सध्या देशभरात भारतीय स्वातंत्र्यदिनाची (Independence Day) तयारी सुरू आहे आणि हा दिवस अधिकृत पातळीवरही मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे. याच पार्श्वभूमीवर, पंतप्रधान मोदींनी त्यांच्या सोशल मीडियावर ‘हर घर तिरंगा’ मोहिमेबाबत चर्चा करणारा एक व्हिडिओ पोस्ट केला.

PM Narendra Modi new Har Ghar Tiranga video

स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने देशभरात ‘हर घर तिरंगा’ (Har Ghar Tiranga) मोहीम सुरू करण्यात आली आहे. पंतप्रधान मोदींनी नागरिकांना या उपक्रमात उत्साहाने सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी लोकांना आपापल्या घरी तिरंगा फडकवून स्वातंत्र्यदिनाचा उत्साह साजरा करण्याचे आवाहन केले.

तसेच, स्वातंत्र्यसैनिकांना श्रद्धांजली वाहण्याचे आणि विकसित भारत घडवण्याचा संकल्प करण्याचे आवाहनही त्यांनी केले. “हर घर तिरंगा, हर मन में तिरंगा” हा संदेश देत, मोदींनी व्हिडिओमध्ये सांगितले की, प्रत्येक घरात राष्ट्रध्वज फडकवल्याने देशभक्तीची भावना अधिक दृढ होईल.

ऑगस्ट महिन्यात देशभरात ‘हर घर तिरंगा’ मोहीम राबवली जात आहे. मात्र, या मोहिमेचा उद्देश केवळ ध्वज फडकवणे हा नाही, तर तिरंग्याबद्दल अभिमानाची भावना निर्माण करणे आणि नागरिकांचे राष्ट्राशी असलेले भावनिक नाते अधिक मजबूत करणे हा यामागचा उद्देश आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी महाराष्ट्र देशाच्या उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही