तुकाराम मुंढेंचा मोठा निर्णय; ‘Save Food Save Drug’ मोहीम, नवीन नियम जारी

दूध आणि दुग्धजन्य पदार्थांतील भेसळ रोखण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाने ‘Save Food Save Drug’ मोहीम सुरू करत संपूर्ण पुरवठा साखळीसाठी नवीन नियम लागू केले आहेत.

Published On: 

Tukaram Mundhe

मुंबई : राज्याचे अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे (Tukaram Mundhe) यांनी अन्नसुरक्षेबाबत सुरू केलेली कारवाई अधिक तीव्र केली आहे. हॉटेल, पनीर विक्रेते आणि बेकरी व्यवसायिकांवरील कारवाईनंतर आता त्यांनी दूध आणि दुग्धजन्य पदार्थांच्या व्यवसायाकडे लक्ष केंद्रित केले आहे. यासाठी ‘Save Food Save Drug’ ही राज्यव्यापी मोहीम सुरू करण्यात आली असून नवीन नियमावलीही लागू करण्यात आली आहे. (Tukaram Mundhe on Action Mode)

पत्रकार परिषदेत (Press Conference) बोलताना तुकाराम मुंढे म्हणाले की, दूध हा प्रत्येकाच्या आहारातील अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. त्यामुळे दूध उत्पादकांपासून ते ग्राहकांच्या ताटापर्यंत संपूर्ण ‘Farm to Plate’ प्रक्रियेत अन्नसुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी स्पष्ट मार्गदर्शक तत्त्वे तयार करण्यात आली आहेत. दुधातील भेसळ आणि कृत्रिम दूध विक्री रोखण्यासाठी विशेष नियम लागू करण्यात आले आहेत.

मुंढे यांनी सांगितले की, दूध संकलन केंद्र, कुलिंग सेंटर, पॅकर्स, वितरक, किरकोळ विक्रेते तसेच पनीर, खवा, लोणी, क्रीम, चीज आणि आईस्क्रीम उत्पादक व विक्रेते यांच्यासाठी एकूण आठ प्रकारचे नियम बंधनकारक करण्यात आले आहेत.

हॉटेल व्यवसायिकांसाठी सुरू केलेल्या मोहिमेचा उल्लेख करत त्यांनी सांगितले की, अनेकांनी आवश्यक सुधारणा केल्या असल्या तरी काही ठिकाणी बनावट पेस्ट कंट्रोल प्रमाणपत्रे सादर केल्याचे आढळले. अशा प्रकरणांमध्ये संबंधितांचे परवाने रद्द करण्यात आले आहे. केवळ कागदपत्रे नव्हे तर प्रत्यक्ष नियमांचे पालन महत्त्वाचे असल्याचा इशारा त्यांनी दिला.

संकलनापासून विक्रीपर्यंत सर्व टप्प्यांवर नियम लागू

महाराष्ट्र शासनाने दूध व दुग्धजन्य पदार्थांच्या संपूर्ण पुरवठा साखळीत अन्न सुरक्षा आणि गुणवत्ता मानकांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी राज्यव्यापी आदेश जारी केला आहे. दूध संकलन, शीतकरण, प्रक्रिया, पॅकेजिंग, साठवणूक, वाहतूक, वितरण आणि विक्री या प्रत्येक टप्प्यावर हे नियम बंधनकारक असतील.

या आदेशाचा उद्देश केवळ भेसळ रोखणे नसून सार्वजनिक आरोग्याचे संरक्षण करणे, प्रामाणिक व्यावसायिकांना प्रोत्साहन देणे आणि राज्यात सुरक्षित अन्न संस्कृती विकसित करणे हा आहे. तपासण्या आणि नमुना विश्लेषणातून दूध पुरवठा साखळीत अनेक गंभीर त्रुटी सातत्याने आढळल्यामुळे ही नियमावली लागू करण्यात आली असल्याचे मुंढे यांनी स्पष्ट केले.

तपासणीत आढळलेल्या प्रमुख अनियमितता

  • दुधात पाण्याची भेसळ
  • कृत्रिम (Synthetic) दूध तयार करून विक्री
  • युरिया, डिटर्जंट, कॉस्टिक सोडा, स्टार्च, ग्लुकोज आणि मेलामाइनसारख्या रसायनांचा वापर
  • मिल्क फॅट आणि SNF मानकांचे उल्लंघन
  • शीतसाखळीचे पालन न करणे
  • विनापरवाना किंवा विना नोंदणी व्यवसाय
  • चुकीचे लेबलिंग करून ग्राहकांची दिशाभूल

📌 महत्वाच्या बातम्या

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही