Share

देणगीचा हिशोब द्या! PMOच्या मागणीनंतर राम मंदिर ट्रस्टने दिलं हे उत्तर

राम मंदिर ट्रस्टच्या देणग्या आणि आर्थिक व्यवहारांची माहिती PMOने मागितली आहे. मात्र चौकशी सुरू असल्याने ट्रस्टने माहिती देण्यास नकार दिला.

Published On: 

देणगीचा हिशोब द्या! PMOच्या मागणीनंतर राम मंदिर ट्रस्टने दिलं हे उत्तर

Ayodhya Ram Mandir Donation Scam:  अयोध्येतील राम मंदिर (Ayodhya Ram Mandir) ट्रस्टच्या देणगी आणि आर्थिक व्यवहारांबाबत नवा वाद निर्माण झाला आहे. श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टकडे असलेल्या देणग्या, बँक खाते, आर्थिक व्यवहार आणि जमीन खरेदीसंदर्भातील माहिती पंतप्रधान कार्यालयाकडून (PMO) मागवण्यात आली होती. मात्र, सध्या सुरू असलेल्या चौकशीचा हवाला देत ट्रस्टने ही माहिती देण्यास नकार दिला आहे.

अयोध्येतील भाजप नेते रजनीश सिंह (Rajnish Sinh) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून राम मंदिर ट्रस्टमध्ये देणगी घोटाळ्या प्रकरणी कारवाईची मागणी केली या पत्राची दखल घेत PMOने जिल्हा प्रशासनाकडून ट्रस्टच्या व्यवहारांची माहिती मागितली होती. या माहितीत ट्रस्टच्या देणग्या, बँक खात्यांचे तपशील, जमीन खरेदी-विक्रीचे व्यवहार आणि इतर आर्थिक नोंदींचा समावेश होता. मात्र, सध्या एसआयटीकडून या प्रकरणाची चौकशी सुरू असल्याने संबंधित कागदपत्रे आणि माहिती देणे शक्य नसल्याचे ट्रस्टकडून सांगण्यात आले आहे.

अयोध्येचे एडीएम इंद्रकांत द्विवेदी (Indrakant Dwivedi) यांनी दिलेल्या माहितीनुसार, ट्रस्टचे चंपत राय यांनी चौकशी समितीकडे आवश्यक कागदपत्रे आणि नोंदी उपलब्ध करून देण्यात येत असल्याचे स्पष्ट केले आहे. चौकशी पूर्ण होईपर्यंत मागवलेली माहिती देता येणार नसल्याचे ट्रस्टने जिल्हा प्रशासनाला कळवले आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी महाराष्ट्र देशाच्या उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही