Rain Update | शेतकऱ्यांनो सावध रहा! ऐन थंडीत राज्यात ‘या’ भागात पावसाची शक्यता

Rain Update | टीम महाराष्ट्र देशा: राज्यामध्ये वातावरणात (Weather) सातत्याने बदल होताना दिसत आहे. राज्यात कुठे थंडी तर कुठे ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. या बदलत्या हवामानाचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहे. अशा परिस्थितीत राज्यात काही भागात पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलेली आहे. हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार, राज्यात 27 जानेवारी … Read more

Published On: 

Rain Update | टीम महाराष्ट्र देशा: राज्यामध्ये वातावरणात (Weather) सातत्याने बदल होताना दिसत आहे. राज्यात कुठे थंडी तर कुठे ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. या बदलत्या हवामानाचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहे. अशा परिस्थितीत राज्यात काही भागात पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलेली आहे. हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार, राज्यात 27 जानेवारी ते 2 फेब्रुवारी दरम्यान पाऊस पडण्याची शक्यता आहे. या अवकाळी पावसामुळे राज्यातील शेतकऱ्यांची पिकं पुन्हा एकदा धोक्यात सापडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

राज्यामध्ये मराठवाडा आणि विदर्भातील काही भागांमध्ये पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मराठवाडा आणि विदर्भातील काही भागांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आज (24 जानेवारी) या भागांमध्ये मेघगर्जनेसह हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. या बद्दलत्या वातावरणामुळे राज्यातील शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडला आहे. कारण अचानक आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावे लागणार आहे.

ढगाळ वातावरणामुळे शेतीतील पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यामध्ये ज्वारी, बाजरी, मका, गहू पिकांच्या नुकसानाची भीती देखील व्यक्त केली जात आहे. आधीच परतीच्या पावसामुळे राज्यातील शेतकरी संकटात सापडला होता. आता पुन्हा एकदा या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्याचा रब्बी हंगाम धोक्यात आहे. त्याचबरोबर या बदलत्या वातावरणाचा परिणाम जनसामान्यांचे आरोग्यावर होताना दिसत आहे.

दरम्यान, डिसेंबरच्या मध्यापासून राज्यात चांगलीच थंडी पसरली होती. या कालावधीमध्ये थंडीने अनेक दशकांचे रेकॉर्ड मोडले आहे. अशात ऐन हिवाळ्यात पावसाचा इशारा देण्यात आल्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांच्या आणि जनसामान्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे. राज्यासह दिल्ली, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, पंजाब, हरियाणा या भागांमध्ये देखील हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे.

महत्वाच्या बातम्या

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत

पत्रकार

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही