Share

Family Vacation | फॅमिलीसोबत फिरायला जाण्याचा विचार करत आहात, तर ‘ही’ ठिकाणं ठरू शकतात सर्वोत्तम पर्याय

🕒 1 min read Family Vacation | टीम महाराष्ट्र देशा: जानेवारी-फेब्रुवारी महिन्यामध्ये फिरण्यासाठी (Travel) वातावरण अतिशय उत्तम असते. या हवामानामध्ये वातावरण जास्त थंड आणि जास्त उष्णही नसते. त्यामुळे बहुतांश लोक या महिन्यांमध्ये फिरायला जाण्याची प्लॅनिंग करत असतात. या वातावरणामध्ये लोक कुटुंबीयांसोबत फिरायला जाण्याची तयारी करत असतात. तुम्ही पण जर तुमच्या कुटुंबासोबत फिरायला जाण्याचा विचार करत … Read more

Published On: 

🕒 1 min read

Family Vacation | टीम महाराष्ट्र देशा: जानेवारी-फेब्रुवारी महिन्यामध्ये फिरण्यासाठी (Travel) वातावरण अतिशय उत्तम असते. या हवामानामध्ये वातावरण जास्त थंड आणि जास्त उष्णही नसते. त्यामुळे बहुतांश लोक या महिन्यांमध्ये फिरायला जाण्याची प्लॅनिंग करत असतात. या वातावरणामध्ये लोक कुटुंबीयांसोबत फिरायला जाण्याची तयारी करत असतात. तुम्ही पण जर तुमच्या कुटुंबासोबत फिरायला जाण्याचा विचार करत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. कारण या बातमीच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला काही ठिकाणांबद्दल माहिती सांगणार आहोत, जिथे तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत फिरायला जाऊ शकतात. पुढील ठिकाणी तुम्ही फॅमिली ट्रिपचा आनंद घेऊ शकतात.

महाबळेश्वर

महाराष्ट्रामध्ये स्थित असलेले महाबळेश्वर ठिकाण कुटुंबासोबत फिरायला जाण्यासाठी एक उत्तम ठिकाण आहे. या ठिकाणाला फळांचे घर असेही म्हणतात. कारण महाबळेश्वरमध्ये अनेक प्रकारच्या फळांची लागवड केली जाते. महाबळेश्वरमध्ये तुम्ही कुटुंबासोबत निसर्गाच्या सानिध्यात ट्रीप साजरी करू शकतात. त्यामुळे तुम्ही जर कुटुंबासोबत फिरायला जाण्याचा विचार करत असाल, तर महाबळेश्वर तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय ठरू शकतो.

उटी

कौटुंबिक सुट्टीसाठी उटी हे एक सर्वोत्तम ठिकाण आहे. उटी शहराच्या मध्यभागी असलेल्या बॉटनिकल गार्डनमध्ये तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारची फुले आणि वनस्पती बघायला मिळतील. उटीमध्ये तुम्ही तुमच्या फॅमिलीसोबत निलगिरी पर्वत, रोझ गार्डन, थ्रेड गार्डन इत्यादी ठिकाणांना भेट देऊ शकतात.

मुन्नार

तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत दक्षिण भारतात फिरायला जाण्याचा विचार करत असाल, तर तुमच्यासाठी मुन्नार हा एक चांगला पर्याय ठरू शकतो. मुन्नारमध्ये तुम्ही बोटिंग, ट्रेकिंग इत्यादी गोष्टींचा आनंद घेऊ शकतात. त्याचबरोबर तुम्हाला जर फोटोग्राफीची आवड असेल, तर हे ठिकाण तुमच्यासाठी नंदनवन ठरू शकते. मुन्नारमध्ये तुम्हाला तुमच्या कुटुंबासोबत स्वादिष्ट पदार्थांचा आस्वाद घेता येऊ शकतो.

महत्वाच्या बातम्या

[emoji_reactions]

Travel

Join WhatsApp

Join Now

🕘 संबंधित बातम्या