Share

उद्धव ठाकरे यांचा पक्ष संपवायला संजय राऊत हेच कारणीभूत; ‘या’ खासदाराचा मोठा दावा

शिंदे गटात प्रवेश केलेले परभणीचे खासदार संजय उर्फ बंडू जाधव यांनी संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांच्यात मतभेद असल्याचा दावा करत राऊतांवर गंभीर आरोप केले आहेत.

Published On: 

उद्धव ठाकरे यांचा पक्ष संपवायला संजय राऊत हेच कारणीभूत; 'या' खासदाराचा मोठा दावा

परभणी : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातून एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शिवसेनेत गेलेले परभणीचे खासदार संजय उर्फ बंडू जाधव (Sanjay urf Bandu Jadhav) यांनी मोठा दावा केला आहे. संजय राऊत (Sanjay Raut) आणि उद्धव ठाकरे यांच्यात सर्व काही आलबेल नसल्याचे सांगत त्यांनी राऊतांवर जोरदार टीका केली.

पाथरी येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याच्या उद्घाटन कार्यक्रमानंतर माध्यमांशी बोलताना खासदार जाधव यांनी हे वक्तव्य केले. या वेळी आमदार सईद खान आणि पाथरीचे नगराध्यक्ष असिफ खान उपस्थित होते.

‘संजय राऊतांमुळे उद्धव ठाकरेंना नुकसान’

खासदार बंडू जाधव यांनी दावा केला की, संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांचे आपसात पटत नाही. मात्र हे मतभेद उघडपणे समोर आणले जात नाहीत. उद्धव ठाकरे यांना राजकीय नुकसान कसे होईल, यासाठीच काही जण काम करत असल्याचा दावा त्यांनी केला.

व्हायरल फोटोवर दिले स्पष्टीकरण

विमानातील एका व्हायरल फोटोवरून झालेल्या चर्चेवरही खासदार जाधव यांनी प्रतिक्रिया दिली. त्या फोटोबाबत चुकीचा अर्थ काढण्यात आल्याचे सांगत त्यांनी स्पष्टीकरण दिले. आपण त्या वेळी उपाशी असल्याने मी ते बदाम काढून खात होतो, ते फोटो आजही माझ्याजवळ उपलब्ध आहेत, तुम्ही ते पाहू शकता, असेही खासदार जाधव यांनी विमानातील व्हायरल फोटोबाबत स्पष्ट केले.

राऊतांवर जोरदार टीका

बंडू जाधव यांनी संजय राऊत यांच्यावर थेट निशाणा साधला. त्यांनी राऊतांवर टीका करत उद्धव ठाकरे यांच्या पक्षाच्या राजकीय परिस्थितीसाठी त्यांना जबाबदार धरले. दरम्यान, खासदार जाधव यांच्या या वक्तव्यामुळे शिवसेना आणि शिंदे गटातील राजकीय आरोप-प्रत्यारोप आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी महाराष्ट्र देशाच्या उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही