Ashish Shelar | “उद्धव ठाकरेंचं भाषण म्हणजे आदळ-आपट अन् थयथयाट”; अशिष शेलार यांचा टोला 

Ashish Shelar | मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. अशातच उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या ९७ व्या जयंती निमित्त केलेल्या भाषणावर भाजप नेते आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी जोरदार टीका केली आहे. उद्धव ठाकरे यांनी केलेले भाषण म्हणजे केवळ आदळ-आपट, थयथयाट आणि नृत्य असल्याचे म्हणत त्यांनी उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र सोडले.

ते म्हणाले, “उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या पक्षाने केलेला वैचारीक स्वैराचार इतिहासात नोंदवला जाईल, असा आहे. त्यामुळे वैचारीक स्वैराचारचे कृत्य म्हणजे उद्धव ठाकरेंच राजकीय जीवन आहे. मला व्यक्तीगत टीका करायची नव्हती. मात्र, त्यांनी काल आमचे बापजादे काढले, म्हणून आज बोलावं लागतं आहे.”

पुढे ते म्हणाले, “उद्धव ठाकरे एक अपयशी नेता आहेत. उद्धव ठाकरेंचे चुलत बंधू त्यांच्यापासून दूर झाले. त्यांच्या पक्षातील नेत्यांनी सुद्धा त्यांना नाकारलं. त्यामुळे कौटुंबिक आणि राजकीय पातळीवर ते अपयशी ठरले आहेत. अशा अपयशी व्यक्तीच्या बोलण्याला किती महत्त्व द्यायचं, याचा विचार करायला हवा.”

“उद्धव ठाकरेंनी मुंबई महापालिका शेठजींसारखी चालवली. त्यांनी बिल्डर, ठेकेदार, डिस्को, पब, बार या सर्वांना त्यांनी सुट दिली. गेल्या २५ वर्षात या दरोडेखोरांनी २२ हजार कोटी खर्च केले, ते काय स्वत:च्या खिशातून खर्च केले का? त्यांनी मुंबई महापालिकेच्या अर्थसंकल्पावर दरोडा टाकला आणि मुंबईकरांना सेवा सुद्धा दिल्या नाहीत”, असा आरोपही शेलार (Ashish Shelar) यांनी केला.

महत्वाच्या बातम्या :

Back to top button