आढळराव- कोल्हे यांच्यात शाब्दिक चकमक शेवटच्या निवडणुकीवरून आरोपप्रत्यारोप

पिंपरी : शिरूर लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार अमोल कोल्हे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार शिवाजीराव आढळराव-पाटील यांच्यात आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडू लागल्या आहेत. ही निवडणूक कुणाची शेवटची यापेक्षा लोकशाहीसाठी महत्त्वाची असल्याचे म्हणत कोल्हे यांनी आढळराव यांना टोला लगाविला. तर, कोल्हेंमध्ये ह्यमीह्ण पणा ठासून भरल्याचा पलटवार आढळराव यांनी केला. ही निवडणूक कुणाची शेवटची यापेक्षा देशासाठी, … Read more

Published On: 

पिंपरी : शिरूर लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार अमोल कोल्हे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार शिवाजीराव आढळराव-पाटील यांच्यात आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडू लागल्या आहेत. ही निवडणूक कुणाची शेवटची यापेक्षा लोकशाहीसाठी महत्त्वाची असल्याचे म्हणत कोल्हे यांनी आढळराव यांना टोला लगाविला. तर, कोल्हेंमध्ये ह्यमीह्ण पणा ठासून भरल्याचा पलटवार आढळराव यांनी केला.

ही निवडणूक कुणाची शेवटची यापेक्षा देशासाठी, देशातील लोकशाहीसाठी महत्त्वाची आहे. राजकीय पक्षांची, लोकसभेची निवडणूक नाही तर ही जनतेची, महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची निवडणूक आहे. जनतेनेच निवडणूक आपल्या हातात घेतली आहे. गेल्या पाच वर्षांत मतदारसंघात झालेला बदल जनतेने अनुभवला असल्याचे कोल्हे म्हणाले.

मी कधी थांबायचे हा माझा प्रश्न आहे. मी थांबू नये, असा अमोल कोल्हेंचा आग्रह असेल तर आणखी चार निवडणूक लढवतो. कोल्हेंमध्ये ह्यमीह्ण पणा ठासून भरला आहे. अजित पवारांसह कोणावरही टीका करण्याचे त्यांचे काम सुरू आहे. हे निवडणूक हातातून निसटल्याचे चिन्ह असल्याचा पलटवार शिवाजी आढळराव यांनी केला.

महत्वाच्या बातम्या

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
MHD News

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही