Hero Scooter | आज लाँच होणार हिरोची ‘ही’ स्कूटर, जाणून घ्या खासियत

Hero Scooter | टीम महाराष्ट्र देशा: वाहन उत्पादक कंपनी Hero Motocorp नेहमी आपल्या ग्राहकांसाठी उत्कृष्ट फीचर्ससह वाहने लाँच करत असते. त्यामुळे कंपनीची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत चालली आहे. अशात कंपनी आज एक स्कूटर सादर करणार आहे. कंपनी आज Hero Xoom 110cc स्कूटर लाँच करणार आहे. कंपनीने सोशल मीडियावर या स्कूटरची एक झलक दाखवली आहे.

या स्कूटरच्या वैशिष्ट्यांबद्दल बोलायचे झाले, तर चांगल्या मायलेजसाठी आणि इंधन वाचवण्यासाठी यामध्ये स्टार्ट/स्टॉप बटन पर्याय असू शकतो. त्याचबरोबर यामध्ये फोन चार्ज करण्यासाठी यूएसबी (USB) सुविधा देखील दिली जाऊ शकते. सामान ठेवण्यासाठी यामध्ये इन्स्ट्रुमेंट कन्सोल अंतर्गत एक स्टोरेज कंपार्टमेंट उपलब्ध असू शकते.

Hero Xoom 110cc या स्कूटरमध्ये 110.9cc इंजिन उपलब्ध असेल. हे इंजिन 8bhp पॉवर आणि 8.7Nm टार्क निर्माण करू शकेल. या स्कूटरचे स्पेसिफिकेशनबाबत बोलायचे झाले, तर यामध्ये टेलिस्कोपिक फ्रंट फोर्स उपलब्ध असेल. Hero Xoom 110cc मध्ये पर्याय म्हणून अलॉय व्हील्स आणि फ्रंट डिस्क ब्रेक देखील मिळू शकतात.

कंपनीने या स्कूटरचा लुक स्पोर्टी बनवला आहे. या स्कूटरवर हँडलबार X ऐवजी चिन्ह दिसत आहे. तर, एलईडी टेललाईटमध्ये देखील X चा वेगळा आकार दिसत आहे. ही स्कूटर सध्याच्या मॉडेलपेक्षा अधिक स्पोर्टी लूक देत आहे.

हिरोच्या या स्कूटरच्या किमतीबद्दल अद्याप कोणत्याही प्रकारची माहिती समोर आलेली नाही. मात्र, ही स्कूटर बाजारात सध्या उपलब्ध असलेल्या होंडा ॲक्टिवाला टक्कर द्यायला सक्षम असेल. कंपनीने सोशल मीडियावर या स्कूटरची झलक दाखवली आहे.

महत्वाच्या बातम्या

Back to top button