Keshav Upadhye | “उध्दव ठाकरेंनी सत्तेसाठी हिंदुत्व सोडलं अन् मुस्लिमांची परिषद घेणाऱ्यांच्या दारात नेऊन ठेवलं”

Keshav Upadhye | मुंबई : मुंबईत आज हिंदू जनआक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. राज्यभरातून हजारो लोक या मोर्चात सहभागी झाले. अशातच देशात हिंदू नेत्यांचं राज्य असताना असा मोर्चा काढावा लागणं दुर्देवाचं असल्याची टीका शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी केलीय. याला आता भाजपा प्रवक्ते केशव उपाध्ये (Keshav Upadhye) यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

“पहिल्यांदा शिवसेना भवन हतबद्ध अन हळहळत असेल आज. सळसळत्या हिंदुत्वाचं हुंकार समोर आहे पण त्याला साथ देता येत नाही, कारण उध्दव ठाकरे यांनी सत्तेसाठी हिंदुत्व सोडल आणि आजच मुस्लिमांची परिषद घेणाऱ्यांच्या शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या दारात नेऊन ठेवलं. बाकी हिंदू समर्थ आहे”, अशा आशयाचं ट्विट केशव उपाध्ये यांनी केलं आहे.

संजय राऊत काय म्हणाले होते?

“शिवसेना भवन हेच हिंदूंचे एकमेव आशास्थान आहे हे आक्रोश मोर्चाने सिध्द केले. आठ वर्षांपासून शक्तिमान हिंदू नेत्यांचे राज्य असताना हिंदूंना आक्रोश करावा लागतो हे अपयश कोणाचे? काश्मिरात पंडितांचा आक्रोश. कारसेवकांच्या हत्या करणाऱ्या मौ. मुलायम यांना पद्मविभूषण हिंदू आक्रोश करणारच!” असं संजय राऊत ट्वीटद्वारे म्हणाले आहेत.

“नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि अमित शाह (Amit Shah) या दोन शक्तीमान हिंदू नेत्यांचं देशात राज्य आहे. त्याचबरोबर महाराष्ट्रात देखील हिंदुंचं राज्य आलं असं सांगण्यात येत आहे. तरी देखील राज्यात आक्रोश मोर्चा निघत आहे,” असं संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या :

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.