Share

Rohit Pawar | “या बाबाची बडबड…”; धीरेंद्र कृष्ण महाराजांच्या ‘त्या’ वक्तव्यावर रोहित पवारांची संतप्त प्रतिक्रिया 

🕒 1 min read Rohit Pawar | अहमदनगर : गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेले बागेश्वर धामचे प्रमुख धीरेंद्र शास्त्री उर्फ बागेश्वर बाबा यांनी संत तुकाराम महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केलेलं आहे. त्यांच्या या वक्तव्याचा विविध स्तरातून निषेध व्यक्त केला जात आहे. संत तुकाराम महाराज यांना त्यांची पत्नी रोज मारहाण करायची, असे विधान धीरेंद्र कृष्ण महाराज … Read more

Published On: 

🕒 1 min read

Rohit Pawar | अहमदनगर : गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेले बागेश्वर धामचे प्रमुख धीरेंद्र शास्त्री उर्फ बागेश्वर बाबा यांनी संत तुकाराम महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केलेलं आहे. त्यांच्या या वक्तव्याचा विविध स्तरातून निषेध व्यक्त केला जात आहे. संत तुकाराम महाराज यांना त्यांची पत्नी रोज मारहाण करायची, असे विधान धीरेंद्र कृष्ण महाराज यांनी केले आहे. त्यांच्या या वक्तव्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी संताप व्यक्त केला आहे. ट्विट करत असताना त्यांनी शिंदे-फडणवीस सरकारवरही निशाणा साधला आहे.

 

“बागेश्वर बाबाने जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकोबारांयांबद्दल गरळ ओकली असताना राज्याचं पालकत्व ज्यांच्याकडं आहे ते मात्र शांत आहेत.. या बाबाची बडबड एकवेळ मध्यप्रदेशात खपेल पण भक्ती-प्रेमाची शिकवण देणाऱ्या संतांबाबत आणि वारकरी संप्रदायाबद्दल बोललेलं महाराष्ट्र कदापि खपवून घेणार नाही”, अशा शब्दात रोहित पवार यांनी संताप व्यक्त केला आहे.

बागेश्वर बाबांचं वक्तव्य काय?

ते म्हणाले, “संत तुकाराम महाराज महाराष्ट्रातील एक महात्मा आहेत. त्यांची पत्नी त्यांना रोज मारहाण करायची. याच कारणामुळे त्यांना एका व्यक्तीने विचारले की तुमची पत्नी तुम्हाला रोज मारहाण करते, मग तुम्हाला वाईट वाटत नाही का? या प्रश्नाचे संत तुकाराम महाराजांनी उत्तर दिले. ते म्हणाले की, देवाची कृपा आहे की मला मारहाण करणारी पत्नी भेटली. मला प्रेम करणारी पत्नी भेटली असती, तर मी देवाच्या प्रेमात पडलोच नसतो. मला मारहाण करणारी बायको मिळाली आहे, त्यामुळे मला प्रभू राम यांची भक्ती करण्याची संधी मिळते, असे संत तुकाराम महाराज म्हणाले होते.”

महत्वाच्या बातम्या :

[emoji_reactions]

Ahilyanagar Maharashtra Marathi News Politics

Join WhatsApp

Join Now

🕘 संबंधित बातम्या