Ajit Pawar | “लव जिहादच्या नावाखाली समाजात विष पेरण्याचं काम सुरु”; अजित पवारांची जहरी टीका 

Ajit Pawar | सांगली : लव्ह जिहाद आणि धर्मांतर कायद्याच्या मागणीला घेऊन आज (२९ जानेवारी) मुंबईत हिंदू जनआक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले. या मोर्चामध्ये भाजपा तसेच शिंदे गटाचे अनेक नेते आणि कार्यकर्ते सहभागी झाले आहेत. यासंदर्भात बोलताना विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी भाजपला अप्रत्यक्षपणे टोला लगावला आहे.

सांगली जिल्ह्यातील कासेगावमध्ये क्रांती वीरांगणा इंदुमती पाटणकर यांच्या स्मारकाचे उद्घाटन विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी अजित पवार बोलत होते.

लव जिहादच्या नावाखाली समाजात विष पेरण्याच काम सुरू असल्याची जहरी टीका अजित पवार यांनी केली आहे. त्याचबरोबर राजकीय पोळी भाजण्यासाठी जाती जातीत तेढ निर्माण केली जात आहे, मात्र आज जे समाजात सुरू आहे त्याविरोधात ज्या प्रमाणात उठाव व्हायला पाहिजे होता, तसा तो होताना दिसत नसल्याची खंत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी (Ajit Pawar on Love Jihad) व्यक्त केली.

दरम्यान, अजित पवार यांनी पहाटेच्या शपथविधीवर बोलणे टाळले. “सारखं सारखं ते उगाळू नका. त्याला तीन वर्षे झालेली आहेत. त्यापेक्षा आपण महागाई, बेरोजगारी आत्ताचे जे काही यक्ष प्रश्न निर्माण झाले आहेत, त्याबद्दल या मीडियाचाही वापर करून लोकांना जागृत कर”, असं अजित पवार यांनी सांगितलं.

सुप्रिया सुळे यांचा मिश्किल टोला-

राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी जन आक्रोश मोर्चाची खिल्ली उडवली आहे. लव्ह जिहादचा अर्थ मला माहीत नाही. ‘लव्ह’चा अर्थ मला कळतो. ‘जिहाद’चा अर्थ मला कळत नाही, असं म्हणत सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी या मोर्चावर प्रतिक्रिया दिलीय.

महत्वाच्या बातम्या :