Share

Gunratn Sadavarte | “शरद पवारांच्या तोंडाला…”; पवारांवर टीका करताना सदावर्तेंची घसरली जीभ

Gunratn Sadavarte | मुंबई : लव्ह जिहाद विरोधी कायदा करा, धर्मांतर विरोधी कायदा लागू करा आणि श्रद्धा वालकरच्या मारेकऱ्याला जन्मठेपेची शिक्षा द्या या मागणीसाठी मुंबईत हिंदू समाजाने आज मुंबईत विराट मोर्च्याचे आयोजन केले आहे. शिवाजी पार्क येथून मोर्चाला सुरुवात केली आहे. याच मोर्चात सामाजिक कार्यकर्ते अॅड. गुणरत्न सदावर्ते (Gunratn Sadavarte) हेदेखील सहभागी झाले. त्यांनी मोर्चामध्ये … Read more

Published On: 

Gunratn Sadavarte | मुंबई : लव्ह जिहाद विरोधी कायदा करा, धर्मांतर विरोधी कायदा लागू करा आणि श्रद्धा वालकरच्या मारेकऱ्याला जन्मठेपेची शिक्षा द्या या मागणीसाठी मुंबईत हिंदू समाजाने आज मुंबईत विराट मोर्च्याचे आयोजन केले आहे. शिवाजी पार्क येथून मोर्चाला सुरुवात केली आहे. याच मोर्चात सामाजिक कार्यकर्ते अॅड. गुणरत्न सदावर्ते (Gunratn Sadavarte) हेदेखील सहभागी झाले.

त्यांनी मोर्चामध्ये सहभागी होत कथित लव्ह जिहाद आणि धर्मांतराच्या मुद्द्यावर बोलताना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका केली. मात्र टीका करत असताना त्यांनी शरद पवार (Sharad Pawar) यांच्या आजाराचा उल्लेख केला आहे.

ते म्हणाले, “लव्ह जिहाद विरोधात आज येथे हिंदू समाज एकवटला आहे. शरद पवार यांच्या तोंडाला आजार झालेला आहे. त्यांना दुसऱ्या विषयावर बोलायला सुचते. मग लव्ह जिहादच्या मुद्द्यावर का बोलत नाहीत?, हैद्राबादचा मियाँभाई लव्ह जिहादवर का बोलत नाही?”

“या सर्वांनाच प्रश्न विचारण्यासाठी, त्यांना उघडे पाडण्यासाठी तसेच लव्ह जिहादला ठोकरून टाकण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहेत,” असेही गुणरत्न सदावर्ते म्हणाले. पुढे ते म्हणाले, “पाकिस्तानी लोकांच्या नीच विचारांमधून लव्ह जिहाद सुरू झाला आहे. या लव्ह जिहादला गाडण्यासाठी आज मुंबईत हिंदू समाज एकवटला आहे. लव्ह जिहादविरोधी कायदा आणावा अशी आम्ही मागणी करतो. दाऊद इब्राहीमचा, बाबरचा विचार दफन करा. संत म्हणून आले आणि धर्मप्रचार करायला लागले आहेत.”

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही