Moto E13 | लाँचपूर्वी जाणून घ्या Moto E13 मोबाईलचे फीचर्स आणि किंमत

Moto E13 | टीम महाराष्ट्र देशा: बदलत्या तंत्रज्ञानामुळे प्रत्येक मोबाईल (Mobile) उत्पादक कंपनी आपले मोबाईल उत्कृष्ट फीचर्ससह बाजारात सादर करत असते. मोबाईल उत्पादक कंपनी मोटोरोला (Motorola) ने नुकताच युरोपमध्ये Moto E13 स्मार्टफोन लाँच केला आहे. कंपनी हा फोन भारतामध्ये फेब्रुवारी महिन्यात लाँच करण्याची योजना आखत आहे. या मोबाईलच्या लाँचपूर्वीच त्याच्या फीचर्स आणि किमतीबद्दल माहिती समोर आली आहे.

Moto E13 फीचर्स

Moto E13 या स्मार्टफोनमध्ये 1 डिस्प्ले- HD + IPS LCD डिस्प्ले उपलब्ध असू शकतो. त्याचबरोबर या फोनमध्ये 720×1600 पिक्सेलची रेसुल्यूशन मिळू शकते. या फोनमध्ये 60Hz आणि 20:9 आस्पेक्ट रेशोचा रिफ्रेश दर मिळू शकतो. या मोबाईलमध्ये UniSoc T606 ऑक्टा कोर प्रोसेसर उपलब्ध असू शकतो. या फोनचा बॅटरीबद्दल बोलायचे झाले, तर यामध्ये 5000mAh बॅटरी असू शकते, जी 10W चार्जिंगच्या सुविधेसोबत मिळू शकते.

Moto E13 कॅमेरा

या मोबाईलच्या कॅमेऱ्याबद्दल बोलायचे झाले, तर यामध्ये LED फ्लॅश लाईटसोबत 13MP मेन बॅक कॅमेरा उपलब्ध असू शकतो. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलसाठी या फोनमध्ये 5MP फ्रंट कॅमेरा दिला जाऊ शकतो. हा फोन Android 13 च्या Go Edition सह लाँच केला जाऊ शकतो.

Moto E13 किंमत

मीडिया रिपोर्ट नुसार, या स्मार्टफोनची किंमत भारतीय बाजारामध्ये 10,000 रुपयांपेक्षा कमी असू शकते. कंपनी हा फोन कमी किमतीत आपल्या ग्राहकांसाठी उपलब्ध करून देणार आहे.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.