Valentine Day | व्हॅलेंटाईन डे साजरा करण्यासाठी ‘ही’ ठिकाणे ठरू शकतात सर्वोत्तम पर्याय

Valentine Day | टीम महाराष्ट्र देशा: फेब्रुवारी महिना जोडप्यांसाठी खूप खास असतो. कारण या महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात व्हॅलेंटाईन वीक साजरा केला जातो. 7 फेब्रुवारी ते 14 फेब्रुवारी दरम्यान व्हॅलेंटाईन वीक साजरा केला जातो. या आठवड्यामध्ये लोक भेटवस्तू, चॉकलेट, गुलाब इत्यादी गोष्टी देऊन प्रेम व्यक्त करतात. 14 फेब्रुवारीला व्हॅलेंटाईन डे साजरा करण्यासाठी जोडपे वेगवेगळ्या ठिकाणी फिरायला जातात. तुम्ही पण जर तुमचा व्हॅलेंटाईन स्पेशल बनवण्यासाठी फिरायला जाण्याचा विचार करत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. कारण या बातमीच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला व्हॅलेंटाईनसाठी कुठे फिरायला जाता येईल, याबद्दल माहिती सांगणार आहोत.

शिमला

या व्हॅलेंटाईनला प्रेम व्यक्त करण्यासाठी तुम्ही तुमच्या जोडीदारांसोबत शिमल्याला भेट देऊ शकतात. शिमला हे एक सुंदर आणि प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे. व्हॅलेंटाईन डे साजरा करण्यासाठी मोठ्या संख्येने जोडपे शिमल्याला भेट देतात. या ठिकाणी तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत उत्कृष्ट क्षण घालवू शकतात.

उदयपूर

व्हॅलेंटाईन डे साजरा करण्यासाठी तुम्ही जर एक रोमँटिक ठिकाण शोधत असाल, तर उदयपूर तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय ठरू शकतो. उदयपूर या शहराला पूर्वीचे व्हेनिस असे देखील म्हणतात. या शहरामध्ये लेक पॅलेसजवळ तुम्ही तुमचा व्हॅलेंटाईन डे उत्कृष्ट पद्धतीने साजरा करू शकतात. या ठिकाणी तुम्ही मावळत्या सूर्यासमोर आपले प्रेम व्यक्त करू शकतात.

गोवा

या व्हॅलेंटाईन डेला तुम्ही जर समुद्रकिनारी तुमचे प्रेम व्यक्त करण्याचा विचार करत असाल, तर गोवा तुमच्यासाठी सर्वोत्तम ठिकाण ठरू  शकते. गोव्यामध्ये तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत स्मरणीय अनुभव घेऊ शकतात. गोव्यामध्ये तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत अनेक गोष्टींचा आनंद घेऊ शकतात.

आग्रा

व्हॅलेंटाईन डे साजरा करण्यासाठी तुम्ही आग्र्याला भेट देऊ शकतात. कारण आग्रामधील ताजमहल हे प्रेमाचे प्रतीक आहे. ताजमहालाच्या समोर तुम्ही तुमचे प्रेम व्यक्त करू शकतात. या ठिकाणी तुम्ही तुमच्या पार्टनरसोबत सरप्राईज वेकेशन प्लॅन करू शकतात.

जैसलमेर

जैसलमेर आजकाल लव्ह पॉइंट म्हणून प्रसिद्ध आहे. प्रेम व्यक्त करण्यासाठी जैसलमेरमध्ये अनेक आकर्षक ठिकाणे आहेत. त्यामुळे जोडपे या ठिकाणाला मोठ्या संख्येने भेट देतात. तुम्ही पण तुमचा व्हॅलेंटाईन डे जैसलमेरमध्ये साजरा करू शकतात.

महत्वाच्या बातम्या