Share

Prakash Mahajan | “बाळासाहेब माझ्या स्वप्नात आले अन् म्हणाले, माझाच मुलगा…”; प्रकाश महाजनांची उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका

🕒 1 min read Prakash Mahajan | मुंबई : मनसेने घे भरारी हे अभियान सुरू केले आहे. त्यानिमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या सभेत बोलताना मनसे नेते प्रकाश महाजन (Prakash Mahajan) यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर मिश्किल टिपण्णी केली आहे. “मला नवरा बनवण्याचे वचन दिले, असं स्वप्न एके दिवशी पक्षप्रमुखाला पडलं. पण हा शब्द देताना तिथे … Read more

Published On: 

🕒 1 min read

Prakash Mahajan | मुंबई : मनसेने घे भरारी हे अभियान सुरू केले आहे. त्यानिमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या सभेत बोलताना मनसे नेते प्रकाश महाजन (Prakash Mahajan) यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर मिश्किल टिपण्णी केली आहे.

“मला नवरा बनवण्याचे वचन दिले, असं स्वप्न एके दिवशी पक्षप्रमुखाला पडलं. पण हा शब्द देताना तिथे फक्त उद्धव ठाकरे आणि अमित शाहच होते. सोबत बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो होता. पण असं काही वचनच दिलं नव्हतं असं भाजपनं सांगितलं. त्यामुळे वाद सुरू झाला. त्यावर मी म्हटलं, बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो समोर ठेवून दोघांनाही विचारावं नक्की काय झालं. पण त्याच दिवशी बाळासाहेब माझ्या स्वप्नात आले. आणि म्हणाले, माझाच मुलगा खोटो बोलतोय.”, अशा शब्दात प्रकाश महाजन यांनी उद्धव ठाकरे यांना टोला लगावला आहे.

“बाळासाहेब ठाकरे यांनी शरद पवारांना कधी मातोश्री आणि सेना भवनला येऊ दिले नाही. मात्र तुम्ही एका मुख्यमंत्रीपदासाठी मातोश्री सोडत काँग्रेसकडे जाऊन बैठका घेता?, असा संतप्त सवाल करत त्यांनी ठाकरेंवर टीका केली.

त्याचबरोबर “दाढीवाल्याच्या मागे दाढीवाला असला तरच मुख्यमंत्री होता येतं, असंही प्रकाश महाजन यांनी यावेळी म्हंटल. “राष्ट्रवादी जेव्हा महाराष्ट्रात स्थापन झाली तेव्हापासून सर्व काही बिघडलं आहे”, असंही प्रकाश महाजन यावेळी बोलताना म्हणालेत.

महत्वाच्या बातम्या :

[emoji_reactions]

Maharashtra Marathi News Mumbai Politics

Join WhatsApp

Join Now

🕘 संबंधित बातम्या