Job Opportunity | टीम महाराष्ट्र देशा: बँकिंग क्षेत्रात नोकरी शोधत असलेल्या इच्छुक उमेदवारांसाठी सुवर्णसंधी आहे. सेंट्रल बँक ऑफ इंडिया (Central Bank of India) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. या पदासाठी पदानुसार पात्रताधारक उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतील. या भरती प्रक्रियेबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी इच्छुक centralbankofindia.co.in या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात.
सेंट्रल बँक ऑफ इंडिया यांच्यामार्फत सुरू करण्यात आलेल्या या भरती प्रक्रियेमध्ये तब्बल 250 रिक्त पदे भरण्यात येणार आहे. या पदांमध्ये मुख्य व्यवस्थापक आणि वरिष्ठ व्यवस्थापक पदाच्या रिक्त जागा भरण्यात येणार आहे. या पदांसाठी इच्छुक उमेदवार 11 फेब्रुवारी 2023 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतील.
या भरती प्रक्रियेमध्ये पदानुसार वेगवेगळे शैक्षणिक पात्रता ठरवण्यात आली आहे. पदानुसार शैक्षणिक पात्रतेबद्दल सविस्तर माहिती मिळवण्यासाठी इच्छुक उमेदवार centralbankofindia.co.in या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात.
सेंट्रल बँक ऑफ इंडिया यांच्यामार्फत सुरू झालेल्या या भरती प्रक्रियेसाठी इच्छुक उमेदवारांना अर्ज भरताना फी भरावी लागणार आहे. सामान्य श्रेणीतील उमेदवारांना 850 रुपये फी भरावी लागणार आहे. तर महिला/SC/ST/PWD/ उमेदवारांना कोणत्याही प्रकारची फी भरावी लागणार नाही. या भरती प्रक्रियेबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी इच्छुक उमेदवार centralbankofindia.co.in या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात.
महत्वाच्या बातम्या
- IND vs NZ | टी-20 मालिकेत टिकून राहण्यासाठी टीम इंडियात होऊ शकतो मोठा बदल, ‘या’ खेळाडूला संधी मिळण्याची शक्यता
- Urfi Javed | उर्फीच्या फॅशनचा ‘कोन’ अंदाज लावणार?
- Weather Update | पुढचे दोन दिवस अतिशय महत्त्वाचे, किमान तापमानात पुन्हा घट होण्याची शक्यता
- Rakhi Sawant | अभिनेत्री राखी सावंतच्या आईने घेतला शेवटचा श्वास
- Eknath Shinde | “तेव्हा मी तीन दिवस एक मिनटंही झोपलो नाही”; मुख्यमंत्र्यांनी सांगितला ‘तो’ किस्सा