🕒 1 min read
मुंबई: चांगल्या नोकरीच्या प्रतीक्षेत असलेल्या हजारो तरुणांसाठी सध्या अनेक संधी उपलब्ध झाल्या आहेत. महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेत ‘कनिष्ठ लिपिक’ पदासाठी तर ‘भारत अर्थ मूव्हर्स लिमिटेड’ (BEML), ‘भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरण’ (IRDAI), ‘केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल’ (CISF) आणि ‘न्यूक्लियर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड’ (NPCIL) यांसारख्या मोठ्या संस्थांमध्ये विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू आहे.
Job Vacancies Apply Now
1. महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक (Maharashtra Urban Co-operative Bank)
- रिक्त पदाचे नाव: कनिष्ठ लिपिक
- शैक्षणिक पात्रता: पदवीधर
- एकूण जागा: 12
- वयोमर्यादा: 22 ते 35 वर्षे
- ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 7 सप्टेंबर 2024
- अधिकृत वेबसाईट: mucbf.in
2. भारत अर्थ मूव्हर्स लिमिटेड (BEML) या सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमात ITI ट्रेनी आणि ऑफिस असिस्टंट ट्रेनी पदांसाठी भरती सुरू आहे.
- ITI ट्रेनी – (Machinist/Electrician/Welder)
- शैक्षणिक पात्रता: ITI आणि 3 वर्षांचा अनुभव
- एकूण जागा: 10 (Machinist), 08 (Electrician), 18 (Welder)
- वयोमर्यादा: 18 ते 32 वर्षे
- ऑफिस असिस्टंट ट्रेनी
- शैक्षणिक पात्रता: डिप्लोमा/पदवी
- एकूण जागा: 76
- वयोमर्यादा: 18 ते 32 वर्षे
- ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख (सर्व पदांसाठी): 4 सप्टेंबर 2024
- अधिकृत संकेतस्थळ: bemlindia.in
3. भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरण (IRDAI)
- रिक्त पदाचे नाव: असिस्टंट मॅनेजर
- शैक्षणिक पात्रता: कोणत्याही शाखेतील पदवीधर
- एकूण रिक्त जागा: 49
- वयोमर्यादा: 21 ते 30 वर्षे
- ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 20 सप्टेंबर 2024
- अधिकृत संकेतस्थळ: irdai.gov.in
4. केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (CISF)
- रिक्त पदाचे नाव: कॉन्स्टेबल/फायर (पुरुष)
- एकूण जागा: 1130
- शैक्षणिक पात्रता: 12 वी (विज्ञान) उत्तीर्ण
- वयाची अट: 18 ते 23 वर्षे
- ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 30 सप्टेंबर 2024
- अधिकृत संकेतस्थळ: cisf.gov.in
5. न्यूक्लियर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (NPCIL)
- रिक्त पदाचे नाव: कॅटेगरी II-स्टायपेंडरी ट्रेनी (ST/TN) मेंटेनर
- शैक्षणिक पात्रता: 10 वी उत्तीर्ण आणि ITI
- एकूण जागा: 126
- वयोमर्यादा: 18 ते 24 वर्षे
- ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 11 सप्टेंबर 2024
- अधिकृत संकेतस्थळ: npcilcareers.co.in
या सर्व भरती प्रक्रियांची सविस्तर माहिती आणि अर्ज करण्यासाठी संबंधित अधिकृत संकेतस्थळांना भेट देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. इच्छूक आणि पात्र उमेदवारांनी वेळेत अर्ज करून या संधीचा लाभ घ्यावा.
📌 महत्वाच्या बातम्या
- छगन भुजबळांच्या निधनाची खोटी बातमी व्हायरल; युट्युब चॅनेलविरोधात नाशिक पोलिसांत गुन्हा
- “धनंजय मुंडे तुमचं फक्त 5 टक्के काढलंय, आणखी काढलं तर 1500 दिवस घरात लपून बसाल!”
- एसटी प्रवाशांना खुशखबर: आगाऊ आरक्षणावर तिकिटात 15% सूट, 1 जुलैपासून अंमलबजावणी