Share

छगन भुजबळांच्या निधनाची खोटी बातमी व्हायरल; युट्युब चॅनेलविरोधात नाशिक पोलिसांत गुन्हा

Fake news of Chhagan Bhujbal’s demise spread on YouTube; case filed in Nashik.

Published On: 

Fake news of Chhagan Bhujbal's demise spread on YouTube; case filed in Nashik.

🕒 1 min read

नाशिक: छगन भुजबळ यांच्याबद्दल एका बनावट व्हिडिओद्वारे त्यांच्या निधनाची खोटी बातमी पसरवण्यात आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. “मंत्री छगन भुजबळ ( Chhagan Bhujbal ) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन” अशा मथळ्याखाली हा व्हिडिओ युट्युबवर व्हायरल करण्यात आला होता. विशेष म्हणजे, या व्हिडिओमध्ये एका वृत्तवाहिनीचा लोगो वापरण्यात आल्याने अनेक नागरिकांची दिशाभूल झाली.

नाशिक शहर आयुक्तालयाच्या सोशल मीडियावर लक्ष ठेवणाऱ्या पथकाला हा आक्षेपार्ह व्हिडिओ निदर्शनास आला. तपासणीअंती असे समोर आले की, हा व्हिडिओ श्रीमती रंजनीताई बोरस्ते यांच्या निधनासंबंधी होता, ज्यात छगन भुजबळ ( Chhagan Bhujbal ) यांनी श्रद्धांजली वाहिली होती. मात्र, अज्ञात संशयिताने मुद्दाम भुजबळ यांच्या निधनाची खोटी टॅगलाईन वापरून हा व्हिडिओ शनिवारी रात्री साडेनऊच्या सुमारास युट्युबवर अपलोड केला. ही बनावट पोस्ट सुमारे सव्वा लाख लोकांपर्यंत पोहोचली, ज्यामुळे समाजात मोठा संभ्रम निर्माण होऊन अफवा पसरली.

Chhagan Bhujbal Fake Death News

याप्रकरणी @Nana127tv या युट्युब चॅनेलविरोधात शहर सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे. सोशल मीडियावर अशा प्रकारे दिशाभूल करणारी आणि खळबळजनक माहिती पसरवणाऱ्यांविरोधात कडक कारवाई केली जाईल.

नागरिकांनी सोशल मीडियावर येणाऱ्या अशा कोणत्याही माहितीची खातरजमा करूनच त्यावर विश्वास ठेवावा आणि अफवांना बळी पडू नये, असे आवाहनही सायबर पोलिसांनी केले आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Crime Maharashtra Marathi News Nashik Politics

Join WhatsApp

Join Now

🕘 संबंधित बातम्या