Share

छगन भुजबळांचा राज्यसभेचा पत्ता कट; नाशिकमध्ये ‘साहेब निर्णय घ्या’ पोस्टर्स झळकल्याने राजकारण तापलं

राज्यसभेची उमेदवारी हुकल्याने छगन भुजबळांचे समर्थक आक्रमक झाले आहेत. येवल्यात ‘साहेब निर्णय घ्या’ अशा आशयाचे बॅनर लागल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

Published On: 

Chhagan Bhujbal News Posters demanding action from Chhagan Bhujbal in Yeola Nashik

नाशिक– ऐनवेळी राज्यसभेची उमेदवारी हुकल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्गज नेते छगन भुजबळ आता वेगळा मार्ग निवडणार का? हा प्रश्न सध्या महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात जोरदार घुमतोय.

सुनेत्रा पवार यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या जागेवर भुजबळांची वर्णी लागेल, अशी दाट शक्यता होती. मात्र, शेवटच्या क्षणी पक्षाने राजेंद्र जैन यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलं. यामुळेच आता नाशिक आणि येवल्यातील भुजबळ समर्थकांचा संताप अनावर झाला आहे.

Chhagan Bhujbal नाराज? ‘साहेब निर्णय घ्या’ ची बॅनरबाजी

तिकीट नाकारल्याची बातमी धडकताच येवला शहरात ठिकठिकाणी समर्थकांनी थेट पोस्टर्स लावले आहेत. “साहेब, आता निर्णय घ्या”, अशी आक्रमक साद या बॅनरवरून घालण्यात आली आहे. राज्यसभा उमेदवारांच्या यादीतून नाव बाहेर पडल्याने समर्थकांमध्ये प्रचंड रोष आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यसभेत जाण्यापूर्वी पुतणे समीर भुजबळ यांना राज्य मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्रीपद द्यावे, अशी अट भुजबळांनी पक्षश्रेष्ठींसमोर ठेवली होती. ही मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामार्फत दिल्लीपर्यंत पोहोचवली गेली.

मात्र, केवळ एका व्यक्तीसाठी मंत्रिमंडळ विस्तार किंवा शपथविधी शक्य नसल्याचे कारण देत दिल्लीतून या प्रस्तावाला नकार मिळाला. याच कारणामुळे पक्षाने राजेंद्र जैन यांना उमेदवारी दिली. स्वतः भुजबळांनीही आपल्याला राज्यसभेत जाण्याची इच्छा होती, अशी स्पष्ट प्रतिक्रिया दिली आहे. त्यामुळे आता या बॅनरबाजीने राजकारण आणखी तापलं असून, भुजबळ काय पाऊल उचलणार याकडे सर्वांचे लक्ष आहे. याबाबत अधिक माहिती हाती आल्यावर बातमी अपडेट केली जाईल.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही