Share

15 लाख कोटींचा घोटाळा, मेहताच्या कंपनीत LIC ने गुंतवणूक केलीच कशी? रोहित पवारांच्या एका ट्विट खळबळ

राजेश मेहता यांच्या १५ लाख कोटींच्या कथित अकाऊंटिंग घोटाळ्यावरून आमदार रोहित पवारांनी ट्विट करत एलआयसी आणि सेबीच्या कारभारावर तीव्र आक्षेप घेतला आहे.

Published On: 

Rohit Pawar tweet regarding Rajesh Mehta Rajesh Exports scam and LIC investment.

इतर मोठ्या म्युच्युअल फंड कंपन्या ज्या कंपनीत साधा एक रुपया टाकायला तयार नव्हत्या, तिथे आपल्या देशातील सर्वात मोठ्या सरकारी विमा कंपनीने म्हणजेच एलआयसीने (LIC Investment) सर्वसामान्यांचा हजारो कोटींचा पैसा का ओतला? देशात तब्बल १५ लाख कोटी रुपयांचा महाघोटाळा उघडकीस आल्यानंतर आता यावरून थेट राजकीय ठिणगी पडली आहे.

बेंगळुरूमधील प्रसिद्ध ‘राजेश एक्स्पोर्ट्स लिमिटेड’चे मालक राजेश मेहता (Rajesh Mehta) यांच्यावर हा अवाढव्य घोटाळा केल्याचा आरोप आहे. शेअर बाजार नियामक संस्था ‘सेबी’ने (SEBI) यावर अंतरिम आदेश जारी केल्यानंतर, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी थेट भाजप आणि केंद्र सरकारवर तोफ डागली आहे.

Rohit Pawar on Rajesh Mehta Scam

रोहित पवार यांनी सोशल मीडियावर एक फोटो ट्विट करत या महाघोटाळ्यावर भाष्य केले आहे. “१५ लाख कोटींचा घोटाळा करणाऱ्या राजेश मेहताचा हा प्रकार जगातील सर्वात मोठा अकाऊंटिंग घोटाळा असणार आहे. इतर कंपन्या इथे गुंतवणूक टाळत असताना एलआयसीने जनतेचा पैसा का गुंतवला?” असा रोकडा सवाल त्यांनी उपस्थित केला.

त्यामुळेच आता सेबीसारख्या यंत्रणा कशा प्रकारे ‘माती खातात’ हे सिद्ध झाल्याचा घणाघात त्यांनी केला. हा पैसा सर्वसामान्य कष्टकरी जनतेचा असून, तो अशा प्रकारे बुडणे अत्यंत दुर्दैवी असल्याची टीका रोहित पवारांनी केली आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राजेश एक्स्पोर्ट्स कंपनीने आर्थिक वर्ष २०२१ ते २०२५ या काळात आपल्या परदेशी कंपन्यांच्या माध्यमातून तब्बल १५.१५ लाख कोटी रुपयांचा महसूल कागदावर फुगवून दाखवला आहे. कंपनीचा ९९.८ टक्के महसूल केवळ कागदोपत्रीच वाढवला गेल्याचा सेबीचा प्राथमिक निष्कर्ष आहे. या धक्क्यानंतर सेबीने राजेश मेहता आणि त्यांच्या कंपनीला शेअर बाजारात व्यवहार करण्यास तात्पुरती बंदी घातली आहे.

दुसरीकडे, राजेश मेहता यांच्या प्रवासाचीही आता जोरदार चर्चा सुरू आहे. अवघ्या १,२०० रुपयांच्या उधारीवर चांदीचा व्यवसाय सुरू करणाऱ्या मेहता यांनी जागतिक स्तरावर सोन्याच्या शुद्धीकरणातील सर्वात मोठी कंपनी ‘व्हॅलकाम्बी’ विकत घेण्यापर्यंत झेप घेतली होती. मात्र, आता सेबीच्या या धडक कारवाईमुळे आणि विरोधकांच्या आक्रमक भूमिकेमुळे मेहता यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही