भीमाशंकर परिसरातील वृक्षतोडीचा मुद्दा तापला, ३२ हजार झाडांच्या कत्तलीवरून रोहित पवारांचा सरकारवर घणाघात

कर्जतमधील भीमाशंकर अभयारण्य परिसरात एका प्रकल्पासाठी होणाऱ्या वृक्षतोडीवरून राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार आक्रमक झाले असून त्यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे.

Published On: 

Rohit Pawar on Junnar crime CM Fadnavis

कर्जत, 25 ऑक्टोबर: राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी भीमाशंकर अभयारण्य परिसरातील हजारो झाडांच्या कत्तलीवरून राज्य सरकारवर सडकून टीका केली आहे. रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात विकासकामांच्या नावाखाली ३२ हजार वृक्ष तोडण्यात आल्याचा दावा करत, पवारांनी या प्रकरणावर सविस्तर सोशल मीडिया पोस्ट लिहून गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत.

कर्जत तालुक्यातील सायडोंगर वनक्षेत्र हे सह्याद्रीच्या कुशीत आणि भीमाशंकर वन्यजीव अभयारण्याला लागून आहे. येथे एका पंप स्टोरेज जलविद्युत प्रकल्पासाठी २३३ हेक्टरवरील घनदाट जंगलात तब्बल ३२ हजारांहून अधिक झाडे तोडण्यात येत आहेत. कागदोपत्री हा आकडा ३२ हजार असला, तरी प्रत्यक्षात तो लाखापर्यंत पोहोचेल, अशी भीती रोहित पवार यांनी व्यक्त केली आहे. या प्रकल्पावरून टोरंट पॉवर कंपनी वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे.

या बेसुमार वृक्षतोडीमुळे पक्षांची घरटी, अंडी आणि पिल्ले निर्घृणपणे नष्ट केली जात असल्याचा आरोप त्यांनी केला. हे जंगल महाराष्ट्राचा राज्यप्राणी शेकरू, बिबटे, भेकर, उदमांजर, खेकडे आणि अनेक दुर्मिळ पक्ष्यांचे हक्काचे घर आहे. झाडांच्या कत्तलीमुळे ही मौल्यवान औषधी वनस्पती आणि वैशिष्ट्यपूर्ण जैवविविधतेने नटलेली संपूर्ण इकोसिस्टिम धोक्यात आली असून वन्यजीव बेघर होत असल्याचे पवारांनी म्हटले आहे.

प्रकल्पासाठी डोंगरांमध्ये जे शक्तिशाली स्फोट केले जातील, त्यामुळे संपूर्ण डोंगर कमकुवत होईल. यातून भविष्यात माळीण किंवा इर्शाळवाडीसारख्या भयंकर दुर्घटनांची पुनरावृत्ती होण्याचा मोठा धोका असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले. मुंबई आणि पुण्याचे हवामान संतुलित राखण्यात कर्जतच्या निसर्गाचा मोठा वाटा आहे. ही वनसंपदा नष्ट झाल्यास केवळ पर्यावरणाचा समतोल बिघडणार नाही, तर स्थानिक आदिवासींच्या जगण्याचा प्रश्नही गंभीर होईल, असा इशारा देण्यात आला आहे.

हे भाजप सरकार भांडवलदारांच्या हातातील बाहुले बनले असून त्यांच्याच फायद्यासाठी मुक्या पशू-पक्षांचा बळी देऊन हा विनाश सुरू असल्याची घणाघाती टीका रोहित पवारांनी केली. ३ नोव्हेंबर रोजी पंतप्रधानांच्या हस्ते या प्रकल्पाचे उद्घाटन होणार असून, तत्पूर्वीच संपूर्ण जंगल नष्ट करण्याचा घाट घातला जात असल्याचा आरोप त्यांनी केला. आपला या प्रकल्पाला किंवा संबंधित कंपनीला विरोध नसून, त्यांनी निवडलेल्या चुकीच्या जागेला विरोध आहे. पर्यावरणाचे नुकसान होणार नाही अशा ठिकाणी प्रकल्प हलवल्यास कोणीही विरोध करणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

राज्य सरकारवर ‘झाडखाऊ सरकार’ अशी खोचक टीका करत त्यांनी महाराष्ट्राचे वाळवंट करण्याचा विडा उचलल्याची शंका व्यक्त केली. पर्यावरणाचे रक्षण करणाऱ्या संस्था सरकारच्या दबावाखाली काम करत असल्याने, आता केवळ जनतेच्या रेट्यातूनच हा विनाश रोखता येईल, असे आवाहन त्यांनी केले. तसेच या विषयाला वाचा फोडणाऱ्या ‘शिवाई न्यूज’ या स्थानिक चॅनलच्या पत्रकारांचे त्यांनी विशेष कौतुक केले आहे. आज आपण शांत राहिलो तर उद्याची पिढी आपल्याला माफ करणार नाही, असेही ते शेवटी म्हणाले.

📌 महत्वाच्या बातम्या

Quick Answers

कर्जत तालुक्यातील सायडोंगर वनक्षेत्रात एका पंप स्टोरेज जलविद्युत प्रकल्पासाठी २३३ हेक्टरवरील घनदाट जंगलात ३२ हजारांहून अधिक झाडे तोडण्यात येत आहेत.

टीप: खालील झटपट उत्तरे AI च्या सहाय्याने तयार करण्यात आली असून ती वरील मूळ बातमीतील माहितीनुसार आहेत. अधिक संदर्भासाठी संपूर्ण बातमी वाचा.

AI-assisted · Powered by Gemini
AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
हेही विचारू शकता
MHD News

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही