Share

नुसरत भरुचाने शेअर केलेल्या ‘त्या’ व्हिडीओने उडवली खळबळ; RCB च्या विजयापेक्षा भलत्याच आवाजाची चर्चा!

आरसीबीच्या विजयानंतर अभिनेत्री नुसरत भरुचाचा एक कथित व्हिडीओ व्हायरल होतोय. यामध्ये आक्षेपार्ह आवाज असल्याचा दावा करत नेटकरी तिला प्रचंड ट्रोल करत आहेत.

Published On: 

Nushrratt Bharuccha Viral Video regarding RCB IPL celebration

तुम्ही सोशल मीडियावर चुकून एखादी चुकीची स्टोरी पोस्ट केली आणि ती सेकंदात लाखो लोकांपर्यंत पोहोचली तर काय होईल? बॉलिवूड अभिनेत्री नुसरत भरुचासोबत सध्या असंच काहीसं घडल्याची जोरदार चर्चा आहे.

३१ मे रोजी पार पडलेल्या आयपीएल २०२६ च्या अंतिम सामन्यात आरसीबीने (RCB) ऐतिहासिक विजय मिळवला. देशभरातील चाहत्यांसह अनेक सेलिब्रिटींनी या विजयाचा आनंद सोशल मीडियावर शेअर केला. याच उत्साहात नुसरतने (Nushrratt Bharuccha) इन्स्टाग्राम स्टोरीवर एक व्हिडीओ शेअर केला, पण या व्हिडीओमुळे तिचं कौतुक होण्याऐवजी भलतीच खळबळ उडाली आहे.

Nushrratt Bharuccha Viral Video

सध्या सोशल मीडियावर एक स्क्रीन रेकॉर्डिंग तुफान व्हायरल होतंय. यात आरसीबीच्या विजयानंतर टीव्ही स्क्रीनवर आतषबाजी सुरू असल्याचं दिसतं. पण नेटकऱ्यांचा दावा आहे की, याच व्हिडीओच्या बॅकग्राउंडला काही आक्षेपार्ह आवाज स्पष्टपणे ऐकू येत आहेत.

या धक्कादायक दाव्यानंतर अभिनेत्रीला प्रचंड ट्रोलिंगचा सामना करावा लागतोय. अनेकांनी यावरून तर्कवितर्क लढवायला सुरुवात केली असून, असंही बोललं जातंय की, चूक लक्षात येताच तिने ती स्टोरी तातडीने डिलीट केली.

पण खरंच नुसरतने असा काही व्हिडीओ पोस्ट केला होता का? याबाबत अजून अधिकृत पुष्टी नाही. कारण तिच्या अधिकृत अकाऊंटवर सध्या असा कोणताही व्हिडीओ उपलब्ध नाही. केवळ ट्विटर आणि रेडिटवर फिरणाऱ्या स्क्रीनशॉट्सवरून हे दावे केले जात आहेत.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आजच्या एआय (AI) आणि एडिटिंगच्या जमान्यात कोणत्याही व्हिडीओचा मूळ आवाज बदलणं अत्यंत सोपं झालंय. त्यामुळे या व्हायरल दाव्यांमध्ये किती तथ्य आहे, याबाबत संशयाचं वातावरण असून चर्चांना उधाण आलं आहे. जोपर्यंत स्वतः अभिनेत्री यावर मौन सोडत नाही, तोपर्यंत याला फक्त अफवाच मानावं लागेल.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही