Share

“धनंजय मुंडे तुमचं फक्त 5 टक्के काढलंय, आणखी काढलं तर 1500 दिवस घरात लपून बसाल!”

Sharad Pawar group leader warns Dhananjay Munde over recent allegations in Beed.

Published On: 

Sharad Pawar group leader warns Dhananjay Munde over recent allegations in Beed.

बीड: जिल्ह्यातील अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचार प्रकरणात राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू झाले असून, यातून जुन्या प्रकरणांनाही पुन्हा तोंड फुटले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) पक्षाचे नेते शिवराज बांगर यांनी मंत्री धनंजय मुंडे ( Dhananjay Munde ) यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे. “धनंजय मुंडे, तुमचे केवळ पाच टक्के बाहेर काढले आहे, आणखी काढले तर पंधराशे दिवस तुम्ही घरात लपून बसाल,” अशा तिखट शब्दांत बांगर ( Shivraj Bangar ) यांनी मुंडेंना इशारा दिला.

बीडमधील अल्पवयीन मुलीच्या लैंगिक अत्याचार प्रकरणात धनंजय मुंडे यांनी भूमिका घेतल्याबद्दल बांगर यांनी त्यांचे अभिनंदन केले. मात्र, जर तुम्हाला अन्यायाची चीड आणि न्यायाची चाड असेल, तर संतोष देशमुख हत्या प्रकरणात तुम्ही का बोलला नाहीत, असा सवाल बांगर यांनी उपस्थित केला. संदीप क्षीरसागर यांच्या सीडीआरची (कॉल डेटा रेकॉर्ड) मागणी करत असताना, सरपंच देशमुख यांच्या हत्येनंतर वाल्मीक कराड 21 दिवस कोणाच्या संपर्कात होता, याचेही सीडीआर बाहेर आले पाहिजेत, अशी मागणी बांगर यांनी केली.

Shivraj Bangar Warns Dhananjay Munde

बांगर यांनी परळीतील सरपंच बापू आंधळे यांच्या खुनाचा कट कुठे शिजला, असा प्रश्नही धनंजय मुंडेंना विचारला. तसेच, करुणा मुंडे यांच्या गाडीत बंदूक कोणी ठेवली, त्यावेळचे सीडीआर तपासणे गरजेचे असल्याचेही ते म्हणाले. धनंजय मुंडे ( Dhananjay Munde ) यांनी अन्यायाची चीड असेल तर देशमुख कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांच्यावरील अन्यायावर बोलले पाहिजे होते, मात्र केवळ मंत्रीपद गेल्याच्या नैराश्यातून ते बोलत असल्याचा आरोप बांगर ( Shivraj Bangar ) यांनी केला.

संतोष देशमुख यांच्या खुनानंतर 21 दिवस वाल्मीक कराड कोणाच्या संपर्कात होता, बापू आंधळे यांच्या खुनाचा कट कोणाच्या कार्यालयात रचला, याचेही सीडीआर बाहेर आले पाहिजेत अशी मागणी शिवराज बांगर यांनी केली. याशिवाय, महादेव मुंडे यांचा खून तहसील कार्यालयासमोर होऊन 20 महिने उलटले तरी आरोपी अद्याप सापडले नाहीत. आरोपी कोण आहेत हे सर्वांना माहीत असून, त्या आरोपींचे आणि धनंजय मुंडे यांचे संबंध काय आहेत, याचेही सीडीआर बाहेर आले पाहिजेत, असे गंभीर आरोप बांगर ( Shivraj Bangar ) यांनी केले.

नेमकं प्रकरण काय?

बीड जिल्ह्यातील एका खाजगी कोचिंग क्लासमध्ये नीट परीक्षेची तयारी करणाऱ्या एका 17 वर्षीय मुलीचा दोन शिक्षकांनी (विजय पवार आणि प्रशांत खाटोकर) लैंगिक छळ आणि छेडछाड केल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. या दोन्ही शिक्षकांविरोधात पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकरणी धनंजय मुंडे ( Dhananjay Munde ) यांनी आरोपी शिक्षक विजय पवार हा आमदार संदीप क्षीरसागर यांचा ‘राईट हँड’ असल्याचा आरोप केला होता, ज्यावरून हे राजकीय युद्ध पेटले आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही