🕒 1 min read
पुणे: महाराष्ट्रात पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीच्या निर्णयावरून गेल्या काही दिवसांपासून राजकीय वातावरण तापले होते. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यासह विरोधकांनी या निर्णयाला तीव्र विरोध दर्शवला होता, इतकेच नाही तर दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र मोर्चा काढण्याचीही घोषणा केली होती. मात्र, अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) यांनी १६ एप्रिल आणि १७ जूनचे दोन्ही वादग्रस्त अध्यादेश रद्द करत असल्याची घोषणा केली. यानंतर, “ठाकरे बंधू एकत्र येत आहेत म्हणूनच तुम्ही जीआर रद्द केला”, अशी टीका फडणवीसांवर होऊ लागली. या टीकेला देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
देवेंद्र फडणवीस मिश्किलपणे म्हणाले, “मी एखादा निर्णय घेतला तरीही दोन भावांना एकत्र यायचं आहे, तर मी काही असा जीआर काढला आहे का की दोन भावांनी एकत्र येऊ नये?”
Devendra Fadnavis Reacts on Raj-Uddhav Thackeray unity
उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray ) यांच्या भूमिकेवरही त्यांनी यावेळी निशाणा साधला. फडणवीस ( Devendra Fadnavis ) म्हणाले, “उद्धव ठाकरेंच्या कार्यकाळात जो अहवाल आला होता, जो अहवाल लिहिण्यात त्यांचा उजवा हात, त्यांचा विश्वासू नेता होता, त्यांनी लिहिलं की पहिली ते बारावी हिंदी सक्तीची करा. तो अहवाल उद्धव ठाकरेंनी त्यावेळी कॅबिनेटमध्ये स्वीकारला आणि नेहमीप्रमाणे घूमजाव केलं. पण आम्हीही कुठलाही अहंकार न बाळगता निर्णय घेतला.”
“मी पुन्हा सांगतो, आम्ही विद्यार्थ्यांच्या हिताचा निर्णय केला आहे. आता समिती स्थापन केली आहे. समिती ठरवेल. आम्ही कुठल्याही पक्षाचं हित बघणार नाही. आम्ही विद्यार्थ्यांचं हित बघू, विद्यार्थ्यांचं हित हेच आमचं लक्ष्य आहे,” असे फडणवीस यांनी ठामपणे नमूद केले.
ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याच्या मुद्द्यावर फडणवीस यांनी चिमटा काढला. ते म्हणाले, “मला अतिशय आनंद आहे जर ठाकरे बंधू एकत्र येत असतील. मी कालच म्हटलं की, आम्हाला राज ठाकरे जो प्रश्न विचारतात तो प्रश्न एकदा त्यांनी उद्धव ठाकरेंना विचारावा.”
“दोन भाऊ एकत्र येवोत, क्रिकेट खेळा, हॉकी खेळा, स्विमिंग करावं, जेवणं करावं, आम्हाला काहीही अडचण नाही,” असे म्हणत फडणवीस यांनी उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray ) आणि राज ठाकरे ( Raj Thackeray ) यांच्यातील राजकीय युतीवर अप्रत्यक्षपणे टोला लगावला. “हे सगळे दुटप्पी लोक आहेत, यांचं सत्तेतलं रूप वेगळं असतं, विरोधातलं वेगळं असतं, खासगीतलं आणखी वेगळं असतं. आम्ही महाराष्ट्राच्या हिताचा निर्णय घेणार आहोत,” असेही फडणवीस ( Devendra Fadnavis ) यांनी स्पष्ट केले.
📌 महत्वाच्या बातम्या
- देवेंद्र फडणवीस मंचावर असताना सरन्यायाधीश गवईंकडून उद्धव ठाकरेंचं कौतुक
- मोदींना मोठा धक्का! “तुमचा दंड BCCI का भरेल?” सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
- राज ठाकरेंची युतीवर सूचक प्रतिक्रिया: मराठी भाषा महत्त्वाची, युत्या-आघाड्या निवडणुकांच्या वेळी!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now












