Share

जनताच सरकारला जमिनीवर आणल्याशिवाय राहणार नाही – उद्धव ठाकरे

NEET पेपरफुटी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारवर विद्यार्थ्यांशी संवाद टाळल्याचा आरोप करत, सत्तेचा अहंकार जनताच उतरवेल आणि शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी चुकीची नसल्याचे म्हटले.

Published On: 

Uddhav Thackeray

मुंबई : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी काल दिल्लीतील जंतरमंतर येथे जाऊन ‘कॉकरोच जनता पार्टी’चे  (CJP) संस्थापक अभिजीत दीपके (Abhijit Dipke) यांची भेट घेतली आणि आंदोलनकर्त्यांशी संवाद साधला. त्यानंतर आज ठाकरे यांनी पत्रकार परिषद (Press Conference) घेऊन केंद्र सरकारवर (Centre Government) जोरदार टीका केली. “एक गोष्ट मी स्पष्ट करू इच्छित. या आंदोलनाला माझा पाठिंबा केवळ कालपुरता मर्यादित नव्हता, तर पहिल्या दिवसापासून मी याला पाठिंबा देत आलो आहे. सर्वांची भेट घेण्यासाठीच मी काल तिथे गेलो होतो. योगायोगाने, काल राहुल गांधींनीही आंदोलन केले. सरकार अत्यंत निर्दयीपणे वागत आहे. ही लोकशाही नाही. आता लोक म्हणत आहेत की, त्यापेक्षा ब्रिटिशच बरे होते. सत्तेत असलेल्यांचा माज वाढला आहे, पण जनतेला तो माज उतरवायला फारसा वेळ लागणार नाही,” असे ठाकरे यांनी ठामपणे सांगितले.

पुढे पत्रकारांशी संवाद साधताना ते म्हणाले की, “कुणीही आंदोलन करत असेल, तर त्यांच्याशी संवाद साधणे आणि चर्चा करणे हे सरकारचे प्राथमिक कर्तव्य आहे. जर आंदोलन चुकीच्या पद्धतीने सुरू असेल, तर त्यांची समजूत काढणे हेदेखील प्रशासनाचे काम असते. मात्र, केंद्र सरकारकडून विद्यार्थ्यांशी योग्य पद्धतीने संवादच झाला नाही. सरकारने वेळीच चर्चेची भूमिका घेतली असती, तर आज ही परिस्थिती उद्भवलीच नसती,”

NEET पेपरफुटी प्रकरणी विद्यार्थी दिल्ली येथे जंतरमंतरवर आंदोलन करत आहे. शिवसेना या आंदोलनकर्त्यांना आधीपासून पाठिंबा देत असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले. “शिवसेना पहिल्या दिवसापासूनच विद्यार्थ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे. काल राहुल गांधी यांनीही याविरोधात आंदोलन केले. या सरकारची विद्यार्थ्यांशी असणारी वागणूक अत्यंत वाईट आणि संतापजनक आहे. सत्ताधाऱ्यांच्या डोक्यात सत्ता आणि अहंकाराची हवा गेली आहे, पण जनताच त्यांना योग्य वेळी जमिनीवर आणल्याशिवाय राहणार नाही, असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी संताप व्यक्त केला.

“मी केवळ अभिजीत आणि इतर विद्यार्थ्यांना भेटायला आलो होतो. जर कोणीही आंदोलन केलं तर सरकारने त्यांच्याशी बोलले पाहिजे. त्यांचे म्हणणे ऐकले पाहिजे. त्यांचा संभ्रम दूर केला पाहिजे. हे सरकारचे काम आहे. अभिजीत आणि सोनम वांगचुक यांच्याशी पहिल्याच दिवशी सरकारने चर्चा केली असती तर आज ही वेळ आली नसती.” असेही उद्धव ठाकरे म्हणाले.

राजीनामा मागण्यात चुकीचं काय?

शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनामावर बोलताना उद्धव ठाकरे यांनी जुन्या काळातील आंदोलनाची आठवण करून दिली. ते म्हणाले की, मी यापूर्वी इंदिरा गांधी आणि अण्णा हजारे यांचं उदाहरण दिले होते. वांगचुक यांचे वडील उपोषणाला बसले होते. तेव्हा इंदिरा गांधी त्यांना भेटले होते. तर अण्णा हजारे यांना भेटायला तत्कालीन केंद्रीय मंत्री विलासराव गेले होते. तुम्ही जबरदस्तीने तुमचं म्हणणं लादत असाल आणि लोकांचं म्हणणं ऐकत नसाल तर ही लोकशाही नाही, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली. “काल मी पाजिले, 9 ते 10 वर्षाच्या मुली आणि महिलांशी ज्या पद्धतीने वागले, निश्चितच ही हिंदु संस्कृती नाही. हे रावण राज नाही आहे. व्यक्ती महत्त्वाचा आहे, की जनता महत्त्वाची आहे, हे कळले पाहिजे. तसेच मंत्र्याचा राजीनामा मागत आहेत, त्यात गैर काय आहे? असा सवाल यावेळी उद्धव ठाकरे यांनी केला.

“या मुलांना आधाराची गरज आहे. हा आधारच तुम्ही तोडून मोडून टाकणार असाल तर ही हुकूमशाही आहे. तुम्ही लोकशाही मानत असाल तर त्यांच्याशी बोलायला कमीपणा का वाटावा? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही