Share

राज ठाकरेंची युतीवर सूचक प्रतिक्रिया: मराठी भाषा महत्त्वाची, युत्या-आघाड्या निवडणुकांच्या वेळी!

Raj Thackeray on alliance with Uddhav Thackeray

Published On: 

MNS spokesperson Prakash Mahajan claims Sanjay Raut is creating hurdles in a potential alliance between Raj Thackeray and Uddhav Thackeray. His repeated remarks are blocking unity efforts.

🕒 1 min read

मुंबई: गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या संभाव्य युतीची चर्चा जोरदारपणे सुरू होती. पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीच्या सरकारच्या निर्णयाला दोन्ही नेत्यांनी एकत्र येऊन तीव्र विरोध दर्शवला, आणि येत्या ५ जुलै रोजी संयुक्त मोर्चा काढण्याचे जाहीर केले होते. यामुळे ठाकरे बंधू पुन्हा एकत्र येणार असे संकेत मिळत होते. मात्र, सरकारने हिंदी सक्तीचा निर्णय रद्द केल्याने ५ जुलैचा मोर्चा रद्द झाला असला, तरी या युतीबाबत सोमवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत राज ठाकरेंनी सूचक भाष्य केले आहे.

हिंदी सक्तीच्या विरोधात ५ जुलै रोजी मोठ्या संख्येने लोक मोर्च्यात सहभागी होण्याचे ठरवले होते. या मोर्चात उद्धव ठाकरेंची शिवसेनाही सहभागी होणार असल्याचे स्पष्ट झाले होते, ज्यामुळे अनेक वर्षांनंतर दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येणार अशी चर्चा होती. परंतु, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी, पावसाळी अधिवेशनाच्या एक दिवसआधी हिंदी सक्तीचा अध्यादेशच रद्द केल्याने, ५ जुलैचा मोर्चा रद्द करावा लागला. तरीही, या निर्णयाच्या विरोधात मिळवलेल्या विजयाचा जल्लोष करण्यासाठी आता विजयी मेळावा आयोजित केला जाणार आहे.

Raj Thackeray comments on Uddhav Thackeray alliance

त्रिभाषा सूत्राचा अध्यादेश रद्द झाल्यानंतर त्यावर प्रतिक्रिया देताना उद्धव ठाकरे गट आणि मनसे या दोन्ही पक्षांचे पदाधिकारी व नेतेमंडळी एकत्र दिसले. यामुळे हीच राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या आगामी युतीची सुरुवात असल्याचे बोलले जात आहे. यासंदर्भात राज ठाकरेंना पत्रकार परिषदेत थेट प्रश्न विचारण्यात आला असता, त्यांनी हिंदी सक्तीच्या या सर्वपक्षीय भूमिकेला ‘पक्षीय लेबल’ लावण्यास नकार दिला. त्याचबरोबर, चर्चेत असलेल्या युतीसंदर्भातही त्यांनी ( Raj Thackeray ) अत्यंत सूचक असे विधान केले.

राज ठाकरे म्हणाले, “मोर्चाला पक्षीय लेबल लावू नका, विजयी मेळाव्यालाही पक्षीय लेबल लावू नका. युत्या-आघाड्या या सगळ्या गोष्टी होत राहतील. पण मराठी भाषा संपली तर परत येणार नाही. भाषा ही संस्कृती टिकवत असते. उद्या तीच गेली, तर या युत्या-आघाड्यांना काय अर्थ आहे?”

ते पुढे म्हणाले, “या सगळ्या गोष्टींचा (युत्या-आघाड्यांचा) विचार निवडणुकांच्या वेळी करता येईल. आत्ता त्या गोष्टीचा विचार करता येणार नाही. आत्ता हिंदीसंदर्भातील या सगळ्या गोष्टींकडे एक संकट म्हणूनच पाहायला हवं. त्याला राजकीय लेबलं लावू नयेत.” असे म्हणत राज ठाकरेंनी ( Raj Thackeray ) सद्यस्थितीत युतीबाबत कोणताही ठोस निर्णय जाहीर होण्याच्या शक्यतांना विराम दिला.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही