Eknath Shinde | “तेव्हा मी तीन दिवस एक मिनटंही झोपलो नाही”; मुख्यमंत्र्यांनी सांगितला ‘तो’ किस्सा

Eknath Shinde | मुंबई : राज्यात महाविकास आघाडीची सत्ता असतानाही शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी करत 40 आमदारांसह बंडखोरी केली. त्या घटनेने राज्यातील राजकारणात सगळ्यात मोठी घडामोड पाहायला मिळाली होती. या बंडखोरीनंतर शिवसेना पक्षात उभी फूट पडली. त्यानंतर राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार कोसळले. ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रिपदावरून पायऊतार व्हावे लागले. याच बंडखोरीबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाष्य केले आहे.

‘समृद्ध महाराष्ट्र’ या संकल्पनेवर आधारित आयोजित केलेल्या ‘सकाळ सन्मान’ या सोहळ्यात एकनाथ शिंदे बोलत होते. एकनाथ शिंदे कायमच लोकांमध्ये दिसतात. त्यामुळे शिंदे झोप कधी आणि किती तास घेतात, असे त्यांना विचारण्यात आले. याच प्रश्नाचे उत्तर देताना शिवसेनेतील आमदारांनी केलेल्या बंडखोरीचे तसेच त्या दिवसांचे स्मरण केले.

“जेव्हा आमदारांनी बंडखोरी केली, तेव्हा मी तीन दिवस एक मिनिटही झोपलो नव्हतो. तेव्हा वेळच तशी होती. मात्र आता कामाचा भार आहे. लोकांनाही भेटावे लागते. प्रशासकीय कामे असतात. शासकीय बैठका असतात. जबाबदारी आहे तर पार पाडण्याचे काम करतो. या सर्व कामांमुळे झोप कमी होते मात्र चालून जाते,” असे एकनाथ शिंदे म्हणाले आहेत.

“माझ्याभोवती असलेली गर्दी हेच माझे टॉनिक आहे. लोकांची कामे, लोकांची गर्दी हीच माझी उर्जा आहे. सहा महिन्यांपूर्वी मी मुख्यमंत्री झालो. मी सहा महिन्यांपूर्वी शाखेत जायचो, लोकांना भेटायचो. आता मुख्यमंत्री झालो आहे. आता मी हे बंद केलं तर मुख्यमंत्री झाल्यावर मी बदललो, असे लोक म्हणतील,” असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले आहे.

महत्वाच्या बातम्या