लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधी मिळणार? एकनाथ शिंदेंनी फडणवीसांसमोरच उघड केलं रहस्य, म्हणाले…

लाडकी बहीण योजनेचे २१०० रुपये योग्य वेळी देणार असल्याचा मोठा खुलासा एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत केला आहे.

Published On: 

Ladki Bahin Yojana 2100: शिंदेंचा मोठा खुलासा!

राजकारणात आश्वासनांचा पाऊस पडतो, पण ती आश्वासने पूर्ण कधी होणार याकडे सर्वांचे डोळे लागलेले असतात. आता राज्यातील लाखो महिलांच्या मनात एकच प्रश्न आहे, तो म्हणजे ‘लाडकी बहीण’ योजनेचे २१०० रुपये खात्यात नक्की कधी जमा होणार?

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्प सादर केल्यानंतर विधिमंडळात मोठी घडामोड पाहायला मिळाली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फडणवीसांच्या उपस्थितीतच घेतलेल्या पत्रकार परिषदेत विरोधकांना थेट आव्हान दिलं आहे. यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि आशिष जयस्वाल हे देखील उपस्थित होते.

Ladki Bahin Yojana 2100

“लाडकी बहीण योजना कधीही बंद पडणार नाही, योग्य वेळ येताच २१०० रुपये महिलांच्या खात्यात नक्की जमा होतील,” असा मोठा गौप्यस्फोट एकनाथ शिंदे यांनी केला आहे. या Ladki Bahin Yojana घोषणेमुळे विरोधकांच्या टीकेला आता जोरदार उत्तर मिळालं आहे. आम्ही फक्त बोलत नाही तर करून दाखवतो, असा घणाघात त्यांनी केला.

यंदाच्या बजेटवर दिवंगत अजित दादांच्या आठवणींचं सावट होतं, असं म्हणत शिंदेंनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. फडणवीस हे उत्तम अर्थशास्त्रज्ञ असल्याचं सांगत शिंदेंनी त्यांच्या व्हिजनचं कौतुक केलं. हा अर्थसंकल्प विकसित महाराष्ट्र २०४७ कडे नेणारा असून, राज्याला १ ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनवण्याचं मोठं ध्येय समोर असल्याचं ते म्हणाले.

राज्यात सध्या ८ ते १० लाख कोटींची पायाभूत सुविधांची कामं वेगात सुरू आहेत. रस्ते, मेट्रो आणि वाढवण बंदराची कनेक्टिव्हिटी यावर सरकारचा मोठा फोकस आहे. महाविकास आघाडीने ५० हजार रुपये प्रोत्साहनपर रक्कम देण्याची केवळ घोषणा केली होती, पण ती प्रत्यक्षात आम्ही दिली, असा दावाही शिंदेंनी केला.

बळीराजासाठी अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजना जाहीर करत महायुती सरकारने शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. याशिवाय बाळासाहेब ठाकरे स्मारकासाठी निधीची कोणतीही कमतरता भासू देणार नाही आणि ‘आरोग्य आपल्या दारी’ ही नवी योजना लवकरच आणणार असल्याचा विश्वास शिंदेंनी व्यक्त केला आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
Maharashtra Desha

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही