Rakhi Sawant | अभिनेत्री राखी सावंतच्या आईने घेतला शेवटचा श्वास

Rakhi Sawant | मुंबई: बॉलीवूड अभिनेत्री राखी सावंत हिच्या आई (Mother) चे काल प्रदीर्घ आजाराने निधन झाले आहे. गेल्या तीन वर्षापासून त्या कॅन्सरला झुंज देत होत्या. अनेक दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते, अखेर शनिवारी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. राखी सावंतने स्वतः आपल्या आईचे निधन झाल्याची माहिती दिली आहे.

राखी सावंतच्या आईवर मुंबईतील सिटी केअर रुग्णालयात उपचार सुरू होते. राखीने काही दिवसांपूर्वी व्हिडिओ पोस्ट करून आईची  प्रकृती बरी नसल्याची माहिती दिली होती. तिची आई ब्रेन ट्युमर आणि कॅन्सरला झुंज देत होती. त्यांचा पोटाचा कॅन्सर फुफ्फुसापर्यंत पोहोचल्याने त्यांचे निधन झाले आहे, अशी माहिती राखीने दिली आहे.

राखी सावंतच्या आईच्या उपचारासाठी सलमान खानसह अनेक सेलिब्रिटीजनी मदत केली होती. त्याचबरोबर देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणजेच मुकेश अंबानी यांनी देखील राखी सावंतला उपचारासाठी मोठी मदत केली होती. सोशल मीडियावर पोस्ट करत राखीने याबाबत खुलासा केला होता.

राखी सावंत मराठी बिग बॉसच्या घरात असताना तिच्या आईची प्रकृती खालावली होती. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याच्यावर जुहूच्या सिटी केअर रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. शेवटच्या क्षणी राखी आपल्या आईच्या जवळच होती.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.