अमीर खान वयाच्या ६१ व्या वर्षी करणार तिसरं लग्न? गौरी स्प्रॅटसोबतच्या लग्नाची तारीख अखेर समोर!

बॉलीवूड अभिनेता अमीर खान येत्या ५ जुलै रोजी त्याची प्रेयसी गौरी स्प्रॅटसोबत अत्यंत खाजगी पद्धतीने तिसऱ्यांदा लग्न करणार असल्याची माहिती समोर आली आहे.

Published On: 

Amir Khan Third Marriage Date Confirm with girlfriend Gauri Sprat in July

बॉलीवूडचा ‘मिस्टर परफेक्शनिस्ट’ अमीर खान (Amir Khan) पुन्हा एकदा बोहल्यावर चढणार असल्याच्या बातमीने सध्या सोशल मीडियावर खळबळ उडवून दिली आहे. दोन अयशस्वी लग्नांनंतर अमीर खरोखरच वयाच्या साठीत तिसरा संसार थाटणार का, या प्रश्नाने चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचवली आहे.

गेल्या वर्षभरापासून अमीर खान आणि त्याची प्रेयसी गौरी स्प्रॅट (Gauri Sprat) यांच्या नात्याची बी-टाऊनमध्ये जोरदार चर्चा रंगली आहे. अशातच हॉटरफ्लायरने बुधवारी केलेल्या एका इन्स्टाग्राम पोस्टमुळे या दोघांच्या लग्नाच्या चर्चांना उधाण आलं असून, थेट तारीख आणि मुहूर्ताची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

Amir Khan Third Marriage Date Confirm

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अमीर आणि गौरी येत्या ५ जुलै रोजी एका अत्यंत खाजगी समारंभात विवाहबंधनात अडकणार आहेत. हा विवाहसोहळा कोणत्याही मोठ्या थाटामाटाशिवाय त्यांच्या राहत्या घरीच नोंदणी (रजिस्टर्ड) पद्धतीने पार पडणार असून, फक्त जवळचे मित्र आणि कुटुंबातील सदस्य या सोहळ्याला उपस्थित राहणार असल्याचं समजतंय.

दुसरीकडे, या लग्नाबाबत अमीर किंवा गौरी यांच्याकडून अजून कोणतीही अधिकृत पुष्टी करण्यात आलेली नाही. मात्र, काही महिन्यांपूर्वी ‘इंडियन एक्सप्रेस’ला दिलेल्या एका मुलाखतीत अमीरने गौरीसोबतच्या गंभीर नात्याचा मोठा गौप्यस्फोट केला होता.

“आम्ही एकमेकांसोबत खूप सिरियस असून एका कमिटेड स्पेसमध्ये आहोत. मी गौरीला मनात कधीच पत्नी मानलंय, आता फक्त या नात्याला कायदेशीर रूप देण्याचा निर्णय आम्ही वेळेनुसार घेऊ,” असं तो म्हणाला होता.

अमीर खानने यापूर्वी रीना दत्ताशी पहिलं लग्न केलं होतं, जे घटस्फोटाने संपलं. त्यानंतर त्याने किरण रावसोबत संसार थाटला, पण त्या दोघांनीही परस्पर संमतीने वेगळं होण्याचा निर्णय घेतला.

किरणशी घटस्फोट झाल्यानंतर अमीरच्या आयुष्यात गौरीची एन्ट्री झाली. त्यामुळेच आता या नव्या डावावर त्यांचे चाहते शुभेच्छांचा वर्षाव करत असतानाच, ५ जुलैला खरोखरच अमीर अधिकृत घोषणा करणार का, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
Maharashtra Desha

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही