🕒 1 min read
राज्य सरकारने जाहीर केलेली २ लाखांची कर्जमाफी शेतकऱ्यांसाठी (Farmer Loan Waiver) खरंच वरदान ठरेल, असं तुम्हाला वाटलं होतं का? जर हो, तर ही बातमी नक्कीच तुमची झोप उडवणारी आहे.
नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत फडणवीस (Devendra Fadnavis) सरकारने २ लाख रुपयांपर्यंतच्या शेतकरी कर्जमाफीची मोठी घोषणा केली खरी, पण यात टाकलेल्या जाचक अटींमुळे आता राज्यभरात राजकारण चांगलंच तापलं आहे. शासनाच्या या निर्णयाविरोधात शेतकरी संघटना आणि विरोधक थेट रस्त्यावर उतरले आहेत.
Maharashtra Farmer Loan Waiver
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या कर्जमाफीतून खासदार, आमदार, नगरसेवक यांच्यासह २५ हजार रुपयांपेक्षा जास्त पगार असलेल्या सरकारी किंवा अनुदानित संस्थांच्या कर्मचाऱ्यांना थेट वगळण्यात आलं आहे.
या अटींमुळे संतापलेल्या किसान सभेने अहिल्यानगरच्या अकोलेत थेट शासनाच्या आदेशाची होळी केली. महात्मा फुले चौकात एकत्र येत त्यांनी राज्यव्यापी आंदोलनाची हाक दिली असून, संपूर्ण कर्जमाफीची आक्रमक मागणी केली आहे.
दुसरीकडे, या मुद्द्यावरून विरोधकांनीही सरकारला धारेवर धरलंय. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी संताप व्यक्त करत गंभीर सवाल उपस्थित केले आहेत. “दोन लाखांवरील रक्कम भरण्यासाठी शेतकऱ्यांकडे पैसे कुठून येणार? खात्यात पैसे कधी पडणार?” असे प्रश्न त्यांनी विचारले. खरीप हंगाम उलटून गेल्यावर पैसे मिळाले तर त्याचा काहीच उपयोग होणार नाही, अशी धक्कादायक माहिती देत त्यांनी या योजनेला केवळ देखावा म्हटलंय.
शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही अत्यंत आक्रमक शब्दांत सरकारचा समाचार घेतला. “देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान मोदी यांच्या घोषणा म्हणजे निव्वळ फसवणूक आहे, ते प्रत्येक योजनेत लोकांची दिशाभूल करत आहेत,” असा मोठा गौप्यस्फोट राऊत यांनी केला.
तसेच, आता शेतकऱ्यांनी कोणतीही तडजोड न करता कडवट भूमिका घ्यावी आणि भाजपला अजिबात मदत करू नये, असं थेट आवाहन त्यांनी केलं आहे. त्यामुळे या कर्जमाफीच्या मुद्द्यावरून राज्यातली खळबळ आणखी किती वाढणार, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- सावधान! समुद्रात उसळणार महाकाय लाटा; पावसाळ्यातले ‘हे’ ६ दिवस घराबाहेर पडूच नका
- इंदोरीकर महाराजांच्या जावयाचा लग्नानंतरचा पहिला वाढदिवस थाटात; कुटुंबाचे खास फोटो पाहून नेटकरीही थक्क!
- ‘माझ्या आयुष्यात नाक खुपसण्याचा अधिकार…’, थलपती विजयसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर त्रिशाचं ट्रोलर्सना सडेतोड उत्तर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now












