Share

इंदोरीकर महाराजांच्या जावयाचा लग्नानंतरचा पहिला वाढदिवस थाटात; कुटुंबाचे खास फोटो पाहून नेटकरीही थक्क!

इंदोरीकर महाराजांचे जावई साहिल चिलप यांचा लग्नानंतरचा पहिला वाढदिवस पत्नी ज्ञानेश्वरी आणि कुटुंबाच्या उपस्थितीत अत्यंत थाटामाटात साजरा झाला असून फोटो व्हायरल होत आहेत.

Published On: 

Indurikar Maharaj Son In Law Birthday celebration photos with Dnyaneshwari and family

🕒 1 min read

इंदोरीकर महाराज (Indurikar Maharaj) आपल्या खास शैलीतील कीर्तनातून समाजप्रबोधन करतात हे तर संपूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे. पण त्यांच्या लेकीच्या लग्नानंतर आता जावयाची इतकी जोरदार चर्चा का होतेय, हे तुम्हाला माहितीये का?

नुकताच इंदोरीकर महाराजांचे जावई साहिल चिलप (Sahil Chilap) यांचा लग्नानंतरचा पहिला वाढदिवस अत्यंत थाटामाटात साजरा झाला. यावेळी स्वतः महाराज, त्यांची पत्नी आणि मुलगा यांनी लेकीच्या सासरी जाऊन जावईबापूंचं खास कौतुक केल्याचे फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

Indurikar Maharaj Son In Law Birthday

अवघ्या महिन्याभरापूर्वी म्हणजेच ३ मे रोजी अहिल्यानगरमध्ये ज्ञानेश्वरी आणि साहिल यांचा अत्यंत शाही विवाहसोहळा पार पडला होता. या सोहळ्याला राज्याच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनीही आवर्जून हजेरी लावली होती. त्यानंतर जेजुरी दर्शन आणि अधिक मासानिमित्त महाराजांच्या घरी पार पडलेल्या ‘धोंडे जेवणा’चीही रंगतदार चर्चा झाली.

जावयाला थेट विष्णूचा अवतार मानून फुलांची उधळण करत त्यांचं औक्षण करण्यात आलं होतं. आता लग्नानंतरच्या या पहिल्याच वाढदिवसानिमित्त पत्नी ज्ञानेश्वरी आणि संपूर्ण चिलप कुटुंबाच्या साथीने साहिल यांचा आनंद गगनात मावत नसल्याचं या फोटोंमधून स्पष्ट दिसतंय.

पण या सगळ्यात साहिल चिलप नेमके आहेत कोण? सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, साहिल हे नवी मुंबईतील प्रसिद्ध उद्योजक सुनील विष्णू चिलप यांचे सुपुत्र आहेत. मूळचे जुन्नर तालुक्यातील काटेडे गावचे रहिवासी असलेले चिलप कुटुंब अत्यंत धार्मिक असून सध्या ते पनवेलमध्ये राहतात. त्यांच्या घरात २४ तास अखंड हरिपाठ सुरू असतो.

दुसरीकडे, या नवदांपत्याच्या शिक्षणाबाबत मोठा गौप्यस्फोट झालाय. व्हायरल झालेल्या लग्नपत्रिकेत शिक्षणाचा कुठेच उल्लेख नसल्याने लोकांमध्ये संभ्रम होता. मात्र, साहिल यांनी गेल्यावर्षीच इंजिनीअरिंग पूर्ण केलं असून, महाराजांची लेक ज्ञानेश्वरी हिने एमसी डीसीएस (MC DCS) पर्यंत मजल मारल्याची खास माहिती समोर आली आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!