प्रतिनिधी, 18 नोव्हेंबर: प्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर यांच्या एका नव्या विधानाने पुन्हा एकदा नवा वाद निर्माण झाला आहे. महिलांबद्दलच्या वादग्रस्त वक्तव्यांसाठी नेहमी चर्चेत असणाऱ्या इंदुरीकर महाराजांनी, ‘मुली कधीच मुलांवर प्रेम करत नाहीत, त्या केवळ पैशांवर प्रेम करतात’, असे विधान नुकत्याच झालेल्या एका कीर्तनात केले आहे.
या कीर्तनादरम्यान प्रेमाची स्वतःची व्याख्या सांगताना ते म्हणाले, “प्रेम वगैरे या सगळ्या वेगळ्या गोष्टी आहेत. इंदुरीकरची व्याख्या आहे लव्ह इज अ मनी आणि मनी इज अ लव्ह. मनी इज लाइफ आणि लाइफ इज अ मनी.”
या विषयावर बोलताना त्यांनी उपस्थितांना सांगितले की, जर कोणी म्हणत असेल की ती पोरगी माझ्यावर प्रेम करते, तर तिच्या मेंदूच्या तीन शिरा चोकअप आहेत, त्या काढून यायला हव्यात. मुलगी पैशावरच प्रेम करते याला पुष्टी देण्यासाठी त्यांनी कीर्तनात बसलेल्या एका तरुणाकडे इशारा केला आणि त्याला मागच्याच महिन्यात मुलीने धोका दिल्याचे उदाहरण देत, तुम्हाला आलेला हा अनुभव असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
या कीर्तनात त्यांनी मोबाईल वापराबाबतही नागरिकांना सल्ला दिला. मोबाईलमुळे लोक वेडी झाली असून ही भारी वस्तू असल्याने ती सतत उघडी ठेवू नका, असेही ते म्हणाले.
📌 महत्वाच्या बातम्या
- Winter Health Care: हिवाळ्यात निरोगी राहण्यासाठी बाजरी, गूळ, तुपासह आहारात करा ‘हे’ बदल
- अर्णब, मुरासूनंतर आता ‘अकवान’ चक्रीवादळाचे संकट; विदर्भासह ‘या’ राज्यांना मुसळधार पावसाचा इशारा
- शतपावलीसाठी घराबाहेर पडला, आरोपींनी डाव साधला; पंढरपुरात राजाभाऊ भिंगेची गोळ्या झाडून हत्या







